'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDEO

'भारतीय राष्ट्रवाद कधीही...' राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर निशाणा; शेअर केला VIDEO

देशात कोरोनाचा कहर आणि अर्थव्यवस्थेवरुन राहुल गांधी वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : कोरोना व्हायरसची वाढती रुग्णसंख्या..देशात सातत्याने लागू केला जाणारा लॉकडाऊन...जीएसटी आणि देशाची बिघडणारी अर्थव्यवस्थेबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेता राहुल गांधी वारंवार केंद्रावर निशाणा साधत आहेत. अनेक वेळा त्यांनी व्हिडीओ शेअर करीत आपलं म्हणणं व्यक्त केलं आहे.

यंदा ही त्यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यावेळी काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी भारताच्या स्वतंत्रता संघर्षादरम्यान अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवणे आणि काँग्रेसच्या वारसाबाबत माहिती दिली. राहुल गांधी यांनी शनिवारी काँग्रेसचा वारसा हक्काबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, स्वराज्य आणि राष्ट्रवाद यांचा सरळ अहिंसेशी संबंध आहे. भारतीय राष्ट्रवाद कधीही क्रुरता, हिंसा आणि धार्मिक तेढ यांना साथ देऊ शकत नाही. राहुल गांधी यांच्या या व्हिडीओमध्ये भारताच्या स्वातंत्र्यात सैनिकांची कहाणी सांगण्यात आली आहे.

यापूर्वी काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केंद्राच्या मोदी सरकारद्वारा कोरोनामुळे संसर्ग झालेल्या हेल्थ केअर कर्मचाऱ्यांची माहिती नसल्याच्या गोष्टींवरुन निशाणा साधला आहे. राहुल यांनी सांगितले की, थाळ्या वाजवणे व दिवा लावण्यापेक्षा जास्त गरजेचे आहे त्यांची सुरक्षा आणि सन्मान

. सांगितले जात आहे की आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी दिलेल्या वक्तव्यात त्यांनी सांगितले आहे की, आरोग्य आणि रुग्णालये राज्यातंर्गत येतात. यासाठी केंद्राजवळ विमा भरपाई डेटा उपलब्ध नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: September 19, 2020, 2:57 PM IST

ताज्या बातम्या