मुंबई 09 ऑक्टोबर: भारतीय मुस्लिम (Indian Muslims) हे जगात सर्वाधिक समाधानी आहेत असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केला आहे. भारत हा सगळ्यांचा देश असून इथे राहण्याचा सर्वांना अधिकार आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. साप्ताहिक विवेकला दिलेल्या एका खास मुलाखतीत ते बोलत होते. केवळ स्वार्थी लोकच कट्टरतावाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देतात, कारण त्यातच त्यांचा स्वार्थ असतो असंही त्यांनी सांगितलं.
मोहन भागवत म्हणाले, जेव्हा केव्हा भारतीय संस्कृतीवर हल्ला झाला तेव्हा सगळ्याच जाती, धर्माचे लोक एकत्र आले हा इतिहास आहे. मुगल शासक अकबर याच्याविरुद्ध जेव्हा महाराणा प्रताप यांनी युद्ध पुकारलं होतं तेव्हा त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिकांची संख्याही खूप मोठी होती असंही ते म्हणाले.
भागवत पुढे म्हणाले, एखाद्या देशावर राज्य करणारा विदेश धर्म अजुनही अस्तित्वात आहे असं उदाहरण फक्त भारतात बघायला मिळतं. पाकिस्तान अजुनही इतर धर्मियांना समान अधिकार नाहीत.
PM नरेंद्र मोदींच्या त्या घोषणेचा चीनला दणका, 5 महिन्यातच दिसून आले परिणाम
भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार आहे किंवा इथे फक्त हिंदूचंच म्हणणे ऐकून घेतले जाईल असं आपल्या राज्यघटनेत म्हटलेलं नाही. कारण आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणजे हिंदू आहे.
कोण कुठल्या ईश्वराची पूजा करतो किंवा त्याची जीवनपद्धती काय आहे याचा हिंदू असण्याची काहीही संबंध नाही. इथे प्रत्येकाला आपल्या श्रद्धेप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. धर्म हा तोडणारा नाही तर सर्वांना एका समान धाग्यात जोडणारा आहे असंही भागवत यांनी सांगितले.
'घराघरांत विवेकानंदांची प्रतिमा लावा, तर पुढील 35 वर्षे राहिल भाजप सरकार'
अयोध्येतलं राम मंदिर हे फक्त दगड विटांचं मंदिर नाही तर ते राष्ट्रीय भावनांचे मंदिर आहे, मानवतेचं मंदिर आहे असंही म्हणाले. राष्ट्राची उन्नती करायची असेल तर सगळ्या समाजाने प्रयत्न केले पाहिजे. ते काम हे फक्त सरकारचे नाही असंही त्यांनी सांगितंलं.