Home /News /national /

आता विमानं आणि एअरपोर्ट्सवर ऐकायला मिळणार भारतीय संगीताची जादू, सरकारने उचललं महत्त्वाचं पाऊल

आता विमानं आणि एअरपोर्ट्सवर ऐकायला मिळणार भारतीय संगीताची जादू, सरकारने उचललं महत्त्वाचं पाऊल

देशातील विमानतळांवर आणि विमानांमध्ये लवकरच आपल्याला भारतीय संगीत (Indian Music in Airlines) ऐकायला मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाधी (Usha Padhee) यांनी देशातील विमान कंपन्यांना आणि विमानतळ ऑपरेटर्सना याबाबत पत्र लिहिलं आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 29 डिसेंबर: देशातील विमानतळांवर आणि विमानांमध्ये लवकरच आपल्याला भारतीय संगीत (Indian Music in Airlines) ऐकायला मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाधी (Usha Padhee) यांनी देशातील विमान कंपन्यांना आणि विमानतळ ऑपरेटर्सना याबाबत पत्र लिहिलं आहे. याबाबत इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिसर्चने (ICCR) नागरी उड्डाण मंत्रालयाला (Civil Aviation Ministry) विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आपल्या पत्रामध्ये उषा पाधी यांनी लिहिलंय की, 'जगभरातील बहुतांश विमानांमध्ये त्या-त्या देशांतील सर्वोत्कृष्ट गाणी ऐकवली (Music in Airlines) जातात. उदाहरण द्यायचे झाल्यास, अमेरिकी विमानांमध्ये जॅझ, ऑस्ट्रियाच्या विमानांमध्ये मोझार्ट आणि मध्य-पूर्व देशांमधील विमानांमध्ये अरबी संगीत ऐकवलं जातं. पण भारतीय विमानांमध्ये क्वचितच भारतीय संगीत (Indian Music) ऐकायला मिळतं. आपल्याला संगीताची समृद्ध अशी परंपरा लाभली आहे. शिवाय आपल्याला अभिमान वाटावा अशा देशातील कित्येक गोष्टींपैकी एक इथलं संगीत आहे. तरीही आपल्याकडे अशी स्थिती आहे.' हे वाचा-नोकरीपेक्षा वरचढ ठरतोय हा व्यवसाय, 15 लाखापेक्षा अधिक फायदा; सरकारची घ्या मदत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी 23 डिसेंबर 2021 रोजी आयसीसीआरच्या मुख्यालयाला भेट दिली होती. आयसीसीआर ही भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे, जी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. या संस्थेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे (ICCR Head) यांनी यावेळी शिंदे यांना आयसीसीआरतर्फे एक पत्र दिलं. या पत्रामध्ये विमानांमध्ये भारतीय संगीत ऐकवलं जात नसल्याबाबत खेद व्यक्त करण्यात आला होता. या पत्रावर अनु मलिक, कौशल एस. इनामदार, मालिनी अवस्थी, शौनक अभिषेकी, मंजुषा कुलकर्णी-पाटील, संजीव अभ्यंकर, रिता गांगुली आणि वसीफुद्दीन डागर यांच्यासह अन्य गायक आणि संगीतकारांनी (Artists and Musicians sign for Indian Music in Airlines) स्वाक्षरी केली होती. भारतीय विमानांमध्ये भारतीय संगीत ऐकवलं जावं, यावर सर्वांचं एकमत होत. हे वाचा-मुंबईकरांना आजही पेट्रोलसाठी मोजावी लागणार मोठी किंमत, वाचा आजचा भाव दरम्यान, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी नागरी उड्डाण मंत्रालयाने खासगी आणि सरकारी विमान कंपन्यांना आपल्या अनाउन्समेंट्समध्ये स्वातंत्र्यसैनिकांबाबत माहिती देण्यास सांगितलं होतं. तसंच, 2019 साली महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त काही विमान कंपन्यांनी आपल्या विमानांवर महात्मा गांधींचा फोटो छापून त्यांना आदरांजली वाहिली होती. एकूणच भारतीय संस्कृती जगासमोर मांडण्यासाठी, आणि देशातील नागरिकांना आपल्या या वारशाची जाणीव करून देण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला विमानांमध्ये भारतीय संगीत ऐकायला मिळणार आहे.
First published:

Tags: Airplane, Airport

पुढील बातम्या