यंदा पाऊस सरासरीएवढाच,हवामान खात्याचा अंदाज

यंदाचा मान्सून सरासरीएवढाच असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2017 07:44 PM IST

यंदा पाऊस सरासरीएवढाच,हवामान खात्याचा अंदाज

18 एप्रिल : यंदाचा मान्सून सरासरीएवढाच असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. हवामान खात्याची आज मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी पत्रकार परिषद झाली. साधारणपणे 96 टक्के पाऊस यंदा पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमधून भारतात प्रवेश करतो. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात राजस्थानमधून मान्सून माघारी जातो.

यंदा भारतामध्ये मान्सूनला सुरूवातीच्या महिन्यांत अल-निनोचा फटका बसणार नाही. मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात शेवटच्या टप्प्यात अल-निनो सक्रिय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. भारतातली बहुतांश शेती मान्सूनवरच अवलंबून असल्यानं मान्सूनचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

का महत्त्वाचा आहे मान्सूनचा अंदाज?

स्कायमेटनं पावसाचा अंदाज सरासरीपेक्षा

Loading...

कमी वर्तवलाय

भारतीय हवामान खात्यानं मात्र स्कायमेटच्या

अंदाजावर बोलणं टाळलंय

कर्नाटकात आताच काही भागात दुष्काळसदृश्य

स्थिती आहे, त्यामुळे पावसाचा अंदाज महत्वाचा

गेल्या वर्षीचा मान्सून सोडला तर गेली काही

वर्षे सलग दुष्काळाचा महाराष्ट्राला फटका

आता पुन्हा जर मान्सूनचा पाऊस कमी झाला

तर पुन्हा दुष्काळाचं सावट

पावसावरच देशाची आर्थिक स्थिती  अवलंबून,

जीडीपीत सर्वात मोठा वाटा कृषी क्षेत्राचा

पावसाची स्थिती चिंताजनक राहिली तर

त्या त्या सरकारांवरही मोठा परिणाम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2017 07:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...