हवामान विभागानं जाहीर केला हाय अलर्ट; या भागात होणार जोरदार पाऊस

हवामान विभागानं जाहीर केला हाय अलर्ट; या भागात होणार जोरदार पाऊस

Monsoon Rain Update : राज्याला असलेला वायू चक्रीवादळाचा धोक टळला आहे. पण, राज्यातील जनतेला प्रतिक्षा आहे ती पावसाची.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून : केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आता पुढील काही दिवसांमध्ये देशात देखील सक्रीय होईल. पण, सध्या हवामान विभागानं वायू चक्रीवादळाचा धोका असल्याची घोषणा केली आहे. राज्याला असलेला धोका टळला असला तरी गुजरातसह इतर राज्यांना मात्र धोका कायम आहे. हवामान विभागानं गुजरात, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आहे. शिवाय, किनारी भागांना जास्त धोका असल्याचं देखील हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत गुजरातपासून वायू चक्रीवादळ हे 930 किमी अंतरावर होतं. हवामान विभागानं उत्तराखंडच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 11 ते 14 जून दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 48 तासामध्ये वायू चक्रीवादळाचा धोका कायम असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Facebookवर ‘भीक’ मागून महिलेनं 17 दिवसात कमावले 35 लाख!

मान्सूनची प्रतिक्षा

केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनची राज्यातील जनतेला प्रतिक्षा आहे. 14 जून पर्यत राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज देखील हवामान तज्ञ्जांनी व्यक्त केला आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. शिवाय, उकाड्यानं देखील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या आहेत. पण, त्यासाठी किमान 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागणार आहे.


भर रस्त्यात जावयावर सपासप वार, VIDEO व्हायरल

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस

राज्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे, मुंबई, कोकण, ठाणेसह आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. तर, नाशिकमध्ये 2 दिवसामध्ये 3 जणांचा बळी गेला. मृत्यू पडलेल्या लोकांना सरकारनं 4 लाखांची मदत जाहीर केली आहे.


गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या