अनेक संकटानंतरही भारतीय न्यायपालिकाच 'सुप्रीम' - निरोप समारंभात सरन्यायाधीश भावूक

अनेक संकटानंतरही भारतीय न्यायपालिकाच 'सुप्रीम' - निरोप समारंभात सरन्यायाधीश भावूक

सर्व संकटं झेलून न्यायव्यवस्था बळकट झालीय. म्हणूनच ती जगात 'सुप्रीम' आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, ता. 1 ऑक्टोबर : भारताची न्यायव्यवस्था सर्व जगात श्रेष्ठ आहे. न्यायव्यस्थेचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यावर अनेक संकटं आली. ती सर्व संकटं झेलून न्यायव्यवस्था बळकट झालीय. म्हणूनच ती जगात 'सुप्रीम' आहे. हे भावनिक उद्गार आहेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे. दीपक मिश्रा सोमवारी (1 ऑक्टोबर) निवृत्त झाले. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने मिश्रा यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात त्यांनी सरन्यायाधीश म्हणून आपलं शेटचं भाषण केलं आणि आठवणींना उजाळा दिला. मी काम करताना लोकांचा इतिहास पाहून नाही तर त्यांचं काम पाहूनच त्यांच्याशी व्यवहार केला असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी नियोजित सरन्यायाधीश रंजन गोगोईही उपस्थित होते.

दीपक मिश्रा आपल्या भाषणात म्हणाले,'' सक्षम न्यायापालिकेसाठी न्यायाधीश आणि वकिलांची भूमिका सर्वात महत्वाची असते. तरूण वकिल आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि क्षमता आहे. ही ऊर्जाच भविष्य उज्ज्वल करणार आहे. समाज ही मुलांची दुसरी आईच असते. श्रीमंत असो की गरिब सगळ्यांचे अश्रू सारखेच असतात.''

राहुल गांधींच्या पदयात्रेला टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस 'रस्त्यावर'!

सरन्यायाधीशांनी कॉलेजियम पद्धतीचही जोरदार समर्थन केलं. या पद्धतीमुळेच न्यायपालिकेचा दबदबा निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी नियोजित सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही मिश्रा यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, मिश्रा यांनी मॉब लिंचिंग आणि ऑनर किलिंग विरूद्ध अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत.

Bapu@150 : लोकांनी गांधीजींना जेव्हा 'बायसेक्सुअल' समजलं!

राज्यघटनेने नेमून दिलेल्या कर्तव्यांचं प्रामाणिकपणे पालन करणं हीच राज्यघटनेप्रती खरं समर्पण असेल. आपण जे खातो, पेहेराव करतो, विश्वास ठेवतो त्या गोष्टी आपल्यांमध्ये भेद निर्माण करतात. पण राज्यघटना मात्र सर्वांना एका सूत्रात बांधून ठेवते. गोगोई हे 3 ऑक्टोबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.

भीमा कोरेगाव प्रकरण: दिल्ली हायकोर्टाने गौतम नवलाखा यांच्यावरील नजरकैद उठवली

सरन्यायाधीश म्हणून त्यांच्या कारकिर्दीचा आजचा शेवटचा दिवस होता. आज 25 मिनिटं कामकाज चाललं त्यावेळी त्यांच्यासोबत जस्टिस रंजन गोगोई आणि ए.एम. खानविलकर उपस्थित होते. कामकाज संपल्यानंतर सर्व वकिलांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. तर एका वकिलाने शुभेच्छा देत 'तुम जियो हजारो साल...' हे गाणही गायलं.

सरन्यायाधीश दीपक मिश्रांनी घेतलेले महत्वाचे निर्णय

18 जानेवारी 2018 : पद्ममावत चित्रपटावरची बंदी उठवली आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे राज्यांना निर्देश दिले.

8 मार्च 2018 : केरळमधल्या हैदिया या तरूणीने इस्लाम धर्म स्वीकारून शाफिन जहाँ याच्यासोबत लग्न केलं होतं. केरळ उच्च न्यायालयाने हे लग्न रद्द ठरवलं होतं. पण सुप्रीम कोर्टानं तो निर्णय फिरवत लग्नाचा पूर्ण अधिकार हैदियाचा आहे असा निर्णय दिला.

9 जुलै 2018 : निर्भया बलात्कार प्रकरणातल्या आरोपींच्या फाशीची शिक्षेवर शिक्कामोर्तब.

17 जुलै 2018 : संसदेने मॉब लिंचिंग विरोधा कायदा करावा असे निर्देश.

6 सप्टेबर 2018 : समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा नियम कलम 377 मधून रद्द.

26 सप्टेंबर 2018 : आधार संवैधानिक पण तो सरसकट लागू करता येणार नाही.

- सुप्रीम कोर्टातल्या महत्वाच्या खटल्यांच्या सुनावणीच्या थेट प्रक्षेपणाला परवानगी.

27 सप्टेंबर 2018 : कलम 497 रद्दबातल. विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही. मात्र घटस्फोटाला कारणीभूत ठरू शकतात.

- मशिद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य घटक नाही. 1994 पासून यासंबंधीचा निर्णय प्रलंबित होता.

28 सप्टेंबर 2018 : शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदी उठवली.

 

First Published: Oct 1, 2018 08:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading