विधानसभा निवडणूक : भारताच्या माजी कर्णधाराचा भाजपमध्ये प्रवेश

विधानसभा निवडणूक : भारताच्या माजी कर्णधाराचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपच्या मेगाभरतीत आता खेळाडूंचाही समावेश.

  • Share this:

हरियाणा, 26 सप्टेंबर : एकीकडे भाजपमध्ये राज्यात आणि देशात भाजपमध्ये मेगाभरती सुरू असताना आता क्रिडापटूंनाही भाजपचे वेध लागले आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप प्रवेशांचे वेग वाढला आहे. हरियाणात 21 ऑक्टोबर रोजी मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान निवडणुकांच्याआधी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. यातच आता भारताच्या प्रसिध्द माजी कर्णधारानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज दुपारी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग यांने भाजपमध्ये प्रवेश केला. याचबरोबर ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

भारताचा माजी कर्णधार संदीप सिंगला आपल्या शानदार फ्लिकसाठी फिल्कर सिंगया नावानं ओळखले जाते. सध्या संदीप हा हरियाणामध्ये डीएसपी या पदावर आहे.

संदीप सिंगला आपल्या शानदार खेळीच्या जोरावर आणि हॉकीमधील कामगिरीच्या जोरावर 2010मध्ये अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. संदीप 2004 ते 2012 दरम्यान भारतीय हॉकी संघाचा भाग होता. 2009मध्ये त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. संदीप पंजाब, हरियाणाचा असून उत्तर भारतात त्याची लोकप्रियता चांगली आहे. 2018मध्ये संदीप सिंगच्या आयुष्यावर दलजीत दोझांज यांनी प्रमुख भुमिका असलेला सुरमा या सिनेमा प्रदर्षित झाला होता.

योगेश्वर दत्तनं केला भाजपमध्ये प्रवेश

संदीप सिंग बरोबरच भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. योगेश्वर दत्त हरियाणा विधानसभेतून निवडणुक लढवण्यास उत्सुक आहे. यासाठी योगेश्वरनं पोलिस खात्यातील आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणामध्ये सध्या भाजपची सत्ता असून राज्यातील 90 ते 75 जागांवर निवडणुत लढवण्याची त्यांची इच्छा आहे. यातच हरियाणातील युवांमध्ये योगेश्वर आणि संदीप सिंग लोकप्रिय आहेत.

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

First published: September 26, 2019, 5:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading