या भारतीय अवलियाने जमावल्या जगातील सर्वाधिक देशांच्या नोटा, जागतिक विक्रमाची नोंद

या भारतीय अवलियाने जमावल्या जगातील सर्वाधिक देशांच्या नोटा, जागतिक विक्रमाची नोंद

जगातील सर्वाधिक देशांच्या चलनी नोटा (Collecting Bank notes of Various Countries ) जमा करण्याचा विक्रम चेन्नईच्या ए. राजेन्द्रन यांनी नोंदवला असून, त्यांच्या या विक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (Asia Book Of Records) आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये(India Book Of Records) झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जानेवारी:  जगातील सर्वाधिक देशांच्या चलनी नोटा (Collecting Bank notes of Various Countries ) जमा करण्याचा विक्रम चेन्नईच्या ए. राजेन्द्रन यांनी नोंदवला असून, त्यांच्या या विक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (Asia Book Of Records) आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (India Book Of Records) झाली आहे. 34 वर्षीय अन्नमलाई राजेंद्रन सॉफ्टवेअर इंजीनिअर आहेत. त्यांच्याकडे तब्बल 410 देशांच्या चलनी नोटा आहेत. त्यापैकी 189 देश संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य देश असून, उर्वरीत 27 देश हे बेट आणि ओव्हरसीज टेरीटरिज आहेत.

आपल्या या विक्रमाबाबत एएनआयशी बोलताना ए. राजेंद्रन म्हणाले, ' मी गेली दहा वर्षे देश विदेशातील चलनी नोटा जमा करण्याचा छंद (Hobby) जोपासतो आहे. काम आणि आयुष्य यांचं संतुलन राखण्याच्या प्रयत्नातून मी या छंदाकडे वळलो. सुरुवातीला नुसता छंद म्हणून मी नोटा जमा करायाला लागलो; पण हळूहळू वेगेवेगळ्या देशांबद्दल माहिती मिळायला लागली, त्यांचे रितीरिवाज, संस्कृती याबाबत कुतूहल वाढलं आणि मी अगदी गंभीरपणे या छंदाकडे बघू लागलो. अगदी झपाटल्यासारखा मी छंदाची जोपासना करू लागलो. '

मित्र आणि परिवारातील सदस्यांनी दिलेल्या नोटांपासून या छंदाची सुरुवात झाली. नंतर मात्र राजेंद्रन यांनी नोटा आणि नाण्यांच्या लिलावातून (Numismatic auctions) दुर्मीळ नोटा जमवल्या. त्यांच्या संग्रहात 17 व्या शतकापासून ते 21 व्या शतकापर्यंतच्या दुर्मीळ नोटांचा समावेश आहे. आताच्या कागदी नोटांसह कापड, पॉलिमर, फोल्ड आणि अगदी कार्डबोर्डपासून बनवलेल्याही नोटा आहेत. राजेंद्रन यांच्या संग्रहात जगातील सोन्याच्या पहिल्या लिलावाच्या कंत्राटाचा निविदाही आहे. अँटीग्वा आणि बार्बुडा याठिकाणाहून हे कागद मिळाले आहेत. काही वर्षांपूर्वी कॅनडाच्या शाही टांकसाळीत तयार करण्यात आलेलं जगातलं पाहिलं अंधारात चमकणारं नाणंही त्यांच्याकडं आहे.

(हे वाचा- Lion costume घालून तो खऱ्या सिंहांसमोर गेला आणि... काय झालं पाहा VIDEO)

भारतातील चौल साम्राज्यातील नाणीही राजेंद्रन यांच्या संग्रहात आहे. रोमन साम्राज्यातील काही दुर्मीळ नाणीही त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या या संग्रहाचं नुकतचं आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीनं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्याचवेळी या विक्रमाचीही नोंद करण्यात आली.

जुन्या, दुर्मीळ नोटा, नाणी जमविण्याच्या छंदाला नोटाफिली (Notaphily) असं म्हणतात. या आधी सर्वाधिक देशांच्या नोटा जमविण्याचा विक्रम कोईम्बतूरच्या जयेशकुमार यांच्या नावावर होता. त्यांच्याकडे 390 देशांच्या नोटा आणि नाणी आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही त्यांच्या विक्रमाची नोंद झाली आहे. जगातील पहिली कागदी चलन असणारी चीनच्या मिंग राजघराण्याची कागदी नोट जयेशकुमार यांच्याकडे आहे. या दोघाही भारतीय विक्रमवीरांना आपल्या छंदाची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुकमध्ये करायची असेल तर त्यासाठी आणखी पुढं जावं लागेल.

(हे वाचा- संचारबंदी असतानाही बाहेर फिरण्यासाठी पतीला बनवलं श्वान, नेमका काय आहे अजब प्रकार वाचा)

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या (Guinness Book of World Records) माहितीनुसार, जगातील सर्वांत जास्त देशांच्या नोटा संग्रहाचा जागतिक विक्रम विसम आली युसुफ या लेबनीज नागरिकाच्या नावावर आहे. त्यांच्याकडे जगातील शेकडो देशांच्या तब्बल 12 हजार 282 नोटा आहेत. त्याचं मूल्य 2 कोटी 16 लाख 26 हजार 696 आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 13, 2021, 5:18 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading