मराठी बातम्या /बातम्या /देश /

Video: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयाचं Airlift..! 470 विद्यार्थ्यांची पहिली बॅच कोणत्याही क्षणी मायदेश

Video: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयाचं Airlift..! 470 विद्यार्थ्यांची पहिली बॅच कोणत्याही क्षणी मायदेश

Russia Ukraine crisis: युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या हजारो भारतीयांना युक्रेनमधून रोमानियामार्गे बाहेर काढण्यात येणार असल्याची घोषणा भारत सरकारने (Indian government) शुक्रवारी केली.

Russia Ukraine crisis: युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या हजारो भारतीयांना युक्रेनमधून रोमानियामार्गे बाहेर काढण्यात येणार असल्याची घोषणा भारत सरकारने (Indian government) शुक्रवारी केली.

Russia Ukraine crisis: युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या हजारो भारतीयांना युक्रेनमधून रोमानियामार्गे बाहेर काढण्यात येणार असल्याची घोषणा भारत सरकारने (Indian government) शुक्रवारी केली.

  • Published by:  Pooja Vichare
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या हजारो भारतीयांना युक्रेनमधून रोमानियामार्गे बाहेर काढण्यात येणार असल्याची घोषणा भारत सरकारने (Indian government) शुक्रवारी केली. यानंतर 470 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुसेवा बॉर्डर क्रॉसिंगद्वारे रोमानियाला पोहोचली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे (Indian Ministry of External Affairs) प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं की, सुसेवा येथील आमची टीम येथील विद्यार्थ्यांना बुखारेस्टला घेऊन जाईल. एएनआय या वृत्तसंस्थेनं शुक्रवारी उशिरा हे वृत्त दिलं आहे. सरकार युक्रेनमधून भारतीयांना रोमानियामार्गे आणणार वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी एअर इंडिया रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे दोन उड्डाणे चालवेल. तसंच युक्रेन-रोमानिया सीमेवर रस्त्यानं येणार्‍या भारतीय नागरिकांना भारतीय सरकारी अधिकारी बुखारेस्टला घेऊन जातील जेणेकरून त्यांना एअर इंडियाच्या दोन विमानांनी परत आणता येईल. युक्रेननं गुरुवारी सकाळी आपली हवाई हद्द बंद केली. त्यामुळे भारताला आपल्या नागरिकांना रोमानियामार्गे परत आणावं लागणार आहे. शुक्रवारी रात्री एअर इंडियाचे बुखारेस्टसाठी उड्डाण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एअर इंडियाचे एक विमान शुक्रवारी रात्री 9 वाजता दिल्लीहून निघेल, तर दुसरे मुंबईहून शुक्रवारी रात्री 10.25 वाजता सुटेल. एअर इंडियाची ही दोन विमाने शनिवारी बुखारेस्टहून भारतासाठी रवाना होतील. दरम्यान त्याआधी युक्रेनमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी सांगितलं की, ते आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे देशात आणण्यासाठी रोमानिया आणि हंगेरीमार्गे निर्वासन मार्ग स्थापित करण्यावर काम करत आहे. वउजहोरोडजवळ चोप-झाहोनी हंगेरियन सीमेवर, चेर्नित्सीजवळ पोरबने-सिरेट रोमानियन सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांचे पथक युक्रेनमधील विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहेत. भारतीय नागरिकांना या गोष्टी सोबत ठेवण्याचा दिला सल्ला युक्रेनमधील भारतीय दूतावासानं सांगितलं की, या सीमा चौक्यांच्या जवळ राहणारे नागरिक, विशेषत: विद्यार्थ्यांना, परराष्ट्र मंत्रालयाच्या टीमच्या संपर्कात राहण्याचा आणि संघटित पद्धतीनं युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला जातो. वरील मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर, स्वतःहून प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना सीमा चौक्यांवर जाण्याचा सल्ला दिला जाईल. भारतीय दूतावासानं नागरिकांना पासपोर्ट, रोख रक्कम (अमेरिकन डॉलरमध्ये), इतर आवश्यक वस्तू आणि कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्रे सोबत सीमा चौक्यांवर नेण्याचा सल्ला दिला आहे. वाहने आणि बसेसवर तिरंगा लावण्याचा सल्ला भारतीय नागरिकांना भारतीय ध्वजाची प्रिंट आऊट घेऊन आणि प्रवासादरम्यान वाहने आणि बसेसवर ठळकपणे चिकटवण्यास सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की सुमारे 20,000 भारतीय, प्रामुख्याने विद्यार्थी, सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनची राजधानी कीव आणि रोमानियन बॉर्डर पोस्टमधील अंतर सुमारे 600 किलोमीटर आहे आणि रस्त्याने प्रवास करण्यासाठी साडेआठ ते 11 तास लागतात. बुखारेस्ट हे रोमानियन चेक पॉईंटपासून सुमारे 500 किलोमीटर अंतरावर आहे आणि रस्त्याने येथे पोहोचण्यासाठी 7 ते 9 तास लागतात. कीव आणि हंगेरियन बॉर्डर पोस्टमधील अंतर सुमारे 820 किलोमीटर आहे आणि ते रस्त्यानं पूर्ण करण्यासाठी 12-13 तास लागतात.
First published:

Tags: Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या