मराठी बातम्या /बातम्या /देश /

'भारतीय मुली केवळ मनोरंजनासाठी सेक्स करत नाहीत'; सुनावणी दरम्यान HCची फटकार

'भारतीय मुली केवळ मनोरंजनासाठी सेक्स करत नाहीत'; सुनावणी दरम्यान HCची फटकार

भारतीय मुली (Indian Girl) केवळ मनोरंजनासाठी सेक्स (Don't Have Sex Just For Fun) करत नाहीत, अशा शब्दांत हाय कोर्टानं कानउघडणी केली आहे.

भारतीय मुली (Indian Girl) केवळ मनोरंजनासाठी सेक्स (Don't Have Sex Just For Fun) करत नाहीत, अशा शब्दांत हाय कोर्टानं कानउघडणी केली आहे.

भारतीय मुली (Indian Girl) केवळ मनोरंजनासाठी सेक्स (Don't Have Sex Just For Fun) करत नाहीत, अशा शब्दांत हाय कोर्टानं कानउघडणी केली आहे.

  • Published by:  News18 Desk

इंदौर, 15 ऑगस्ट: भारतीय मुली (Indian Girl) केवळ मनोरंजनासाठी सेक्स (Don't Have Sex Just For Fun) करत नाहीत. आपल्या प्रियकराकडून जेव्हा लग्नाचं आश्वासन मिळतं तेव्हाच त्या लैंगिक संबंधासाठी तयार होतात, अशी टिप्पणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं (MP High Court) केली आहे. एका बलात्कार प्रकरणी सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. तसेच यावेळी न्यायालयानं बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीनही नाकारला आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, कोणत्याही मुलीशी शारीरिक संबंध ठेवताना संबंधित मुलानं त्याचे भविष्यात होणारे परिणाम लक्षात ठेवले पाहिजेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

उज्जैन पोलिसांनी 4 जून रोजी एका तरुणाला बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. आरोपी तरुणानं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला होता. दरम्यान यावर्षी जूनमध्ये आरोपीनं आपल्या दुसऱ्या एका मुलीशी लग्न करत असल्याचं पीडितेला सांगितलं. यामुळे पीडितेनं फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं ती बचावली आहे. यानंतर प्रियकर तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा- POCSO Court: मुलीचा हात पकडणं म्हणजे लैंगिक अत्याचार नाही, न्यायालयानं दिला महत्त्वाचा निर्णय

याच गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी आरोपीच्या वकिलानं उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायाधीश सुबोध अभ्यंकर म्हणाले की,- 'भारतीय समाज आजही पुराणमतवादी आहे. हा समाज सभ्यतेच्या पातळीवर इतकाही आधुनिक झाला नाही की, जेथे कोणत्याही धर्माच्या अविवाहित मुलगी, केवळ मनोरंजनासाठी सेक्स करेल. प्रियकराकडून लग्नाच वचन दिल्याशिवाय भारतीय मुली शारिरीक संबंध ठेवत."

हेही वाचा-बायकोच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवणं बेकायदेशीर नाही - कोर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं पीडित मुलीला लग्नाचं आश्वासन देत तिच्यावर बलात्कार केला होता. पण आरोपी तरुणाच्या मते संबंधित मुलीसोबत त्याचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यावेळी तक्रारदार मुलगी 21 वर्षांची होती आणि दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्याचा युक्तीवादही अर्जदारांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. दुसरीकडे फिर्यादीनं मात्र आरोपीनं खोटं आश्वासन देत ऑक्टोबर 2018 पासून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

First published:

Tags: Crime news, High Court, Madhya pradesh, Rape