BREAKING 'पाकिस्तानचे विमान भारताने पाडले, मिग 21 चा पायलट बेपत्ता'

BREAKING 'पाकिस्तानचे विमान भारताने पाडले, मिग 21 चा पायलट बेपत्ता'

भारताने युद्धाची कधीही भाषा केली नाही. पाकिस्तानला वारंवार सांगूनही त्यांनी दहशतवाद्यांना मदत करणं सुरूच ठेवलं त्यामुळेच भारताला कारवाई करावी लागली.

  • Share this:

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावत त्यांनी भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

काय म्हणाले रवीश कुमार?

"सोमवारी भारताने जैश ए मोहम्मदच्या तळावर हल्ला करत तो तळ नष्ट केला. भारताची ही दहशतवादाविरोधातली कारवाई होती. आज  पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला चोख उत्तर देत भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान  पाडले आहे.  पाकिस्तानच्या हद्दीत हे विमान पाडण्यात आले. या हवाई भारताने मीग 21 हे विमान गमावले आहे. यात विमानाचा पायलट बेपत्ता असून त्याचा शोध आम्ही घेत आहोत." अशी माहिती परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली."

पाकिस्तानचा दावा फेटाळला

पाकिस्तानने भारताची विमानं पाडल्याचा दावा भारताने फेटाळून लावला होता. आता यावर पाकिस्तान तोंडघशी पडलं असून पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी भारताच्या बडगाममधील विमान कोसळण्याच्या घटनेत आमचा हात नसल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानचं एफ -16 हे विमान भारताच्या हद्दीत घुसलं होतं. पण भारताने नौशेरा क्षेत्रात हे विमान पाडलं. पाकिस्तानच्या विमानाने हवाई हद्दीत घुसून बॉम्बहल्ला केला पण यात कोणीही जखमी झालं नाही, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी सोडला अर्ध्यावर कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सुरू असलेला आपला कार्यक्रम अर्ध्यावरच सोडला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवरच एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी आपला कार्यक्रम सोडून गेल्याची माहिती आहे.

दरम्यान, ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात जाऊन मारलं जातं तर आजच्या परिस्थितीत काहीही शक्य आहे, असं विधान केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलं आहे. भारत आणि पाकस्तानमध्ये सीमेवर तणाव निर्माण झाला असताना जेटली यांनी केलेलं हे विधान महत्त्वपूर्ण आहे.

पाकिस्तान घेतोय तेलाचा आढावा

पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने देशातल्या तेल कंन्यांच्या प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर तेलाचे किती साठे उपलब्ध आहेत याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

भारता आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून भारताकडून हल्ल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लष्कराला पेर्ट्रोलियम पदार्थांचा पुरवठा कायम राहावा यासाठी काय करता येईल याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.

अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तान अमेरिकेच्या परवानगीशिवाय त्यांनी दिलेली शस्त्रास्त्रं वापरू शकत नाही, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकेने वेळोवेळी पाकिस्तानला शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञान याचा पुरवठा केला आहे. आता युद्धाची परिस्थिती ओढवली तरीही भारताविरुद्ध पाकिस्तानला ही अमेरिकन शस्त्र वापरता येणार नाहीत, असं अमेरिकेच्या या ताज्या इशाऱ्यावरून दिसत आहे.

अमेरिकेने पाकिस्तानला परवानगीशिवाय शस्त्र न वापरण्याचं सांगितलं आहे, अशी बातमी टाईम्स नाऊने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेदरम्यान शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी जो काही करार झाला, त्यात हे अंतर्भूत होते. त्यामुळे याच कराराच्या तरतूदीची आठवण अमेरिकेने दिली आहे.

अमेरिका हे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचे मित्रराष्ट्र आहे. त्यामुळे दोन्ही देशांना अमेरिकेकडून मदत मिळालेली आहे. आता मात्र युद्ध परिस्थिती ओढवली, तर या शस्त्रांचा वापर पाकिस्तानने भारताविरुद्ध करू नये, अशी अमेरिकेची इच्छा आहे. indian Foreign Secretary Vijay Gokhale

VIDEO : चिठ्ठी मिळाली अन् मोदींनी अर्ध्यावरच सोडला कार्यक्रम, पाहा नेमकं काय घडलं?

First published: February 27, 2019, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading