नवी दिल्ली, 19 जानेवारी : चीन आणि भारताचे संबंध (India china relations) सीमावादावरून पूर्वीच ताणले गेलेले आहेत. अशातच आता एका नवीन धक्कादायक बातमीची या वादात भर पडली आहे. भारताचं इशान्येकडील राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशामध्ये (Arunachal Pradesh) चीन चक्क एक गाव (village) वसवतो आहे ही ती बातमी. आता या बातमीवर परराष्ट्र मंत्रालयानं (foreign ministry) स्पष्टीकरण दिलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे, 'आम्ही भारताच्या सीमांवर चीन गाव वसवत असल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत. अशा वादग्रस्त ठिकाणांचं निर्माण चीन गेली अनेक वर्ष करतो आहे. याचंच उत्तर म्हणून भारतही सीमेवर (India border) आपली मुलभूत यंत्रणा बळकट करत आहे. आम्ही रस्ते (roads), पूल (bridges) अशा गोष्टींची उभारणी करत आहोत. यातून लोकांच्या भविष्यातील समस्या सुटतील.
मंत्रालयाच्या सांगण्यानुसार, सीमावर्ती प्रदेशांवर सतत नजर ठेवली जात आहे. देशाचं सावभौमत्व आणि सीमांची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी सर्व गरजेची पावलं उचलली जात आहेत. सरकार सीमावर्ती भागात विविध गोष्टी उभारण्यासाठी कटिबद्ध आहे. यातून स्थानिकांचं आयुष्य सोपं होईल. यात अरुणाचल प्रदेशाचाही समावेश आहे.
विशेष हे, की एनडीटीव्हीनं एक
वृत्त दिलं आहे, की चीननं अरुणाचल प्रदेशात एक गाव वसवलं आहे. या वृत्तानुसार, चीननं या गावात जवळपास 10 घरंसुद्धा बांधली आहेत. त्सारी चू नावाचं हे गाव भारतीय सीमेच्या (Indian border) साडेचार किलोमीटर आत वसलेलं आहे. हे गाव अरुणाचल प्रदेशाच्या वरच्या भागातील सुबनसिरी जिल्ह्यात वसलेलं आहे. या गावाच्या किनाऱ्यावर त्सारी चू नावाची नदीसुद्धा वाहते.
वृत्तानुसार, चीनचं हे गाव भारताच्या सुरक्षेसाठी (security) खूप धोकादायक बनलं आहे. हे गाव त्सारी चू नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. हा सगळा तो भाग आहे जिथं दोन देशांमध्ये दीर्घकाळापासून विवाद सुरू आहे. या भागाला सशस्त्र लढाई झालेला भाग म्हणून निश्चित केलं गेलं आहे. हे गाव गलवान घाटीमध्ये (Galwan Ghati) भारत आणि चीनदरम्यान हिंसक संघर्ष झाल्यानंतर हिमालयाच्या पूर्व रेंजेसमध्ये वसवलं गेलं. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.