नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : कोरोना काळात डबघाईला गेलेली भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy coming back on track) पुन्हा रुळावर येत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. गाळात रुळत चाललेला अर्थगाडा आता पुन्हा वेग पकडत असून सप्टेंबर महिन्यात (Picture of economy in September is positive) देशात दिसलेला आर्थिक प्रगतीचा वेग आशादायक चित्र निर्माण करणारा असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना पूर्व काळात जो आर्थिक प्रगतीचा वेग होता, त्याच्या (Economic developments at Pre corona level) जवळपास 90 टक्के वेगानं सध्या आर्थिक विकास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कोरोना होतोय कमी
कोरोनाची दुसरी लाट संपत चालली आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये नव्यानं आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असून जनजीवन कोरोना पूर्व काळाकडे वाटचाल करत आहे. अजूनही उद्योगधंदे हे कोरोनापूर्व क्षमतेने सुरू झालेले नाहीत. कोरोना काळात बंद पडलेले अनेक व्यवसाय आणि उद्योग हे कोरोनाच्या आक्रमणानंतर पुन्हा उभेच राहू शकलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी तिसऱ्या लाटेची भीती वर्तवण्यात येत होती. मात्र आता ती भीतीदेखील कमी होऊ लागल्याचं चित्र आहे. देशात ज्या वेगानं लसीकरण होत आहे, ते पाहता तिसऱ्या लाटेची भीती कमी झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. याचा परिणामही अर्थचक्रावर होताना दिसत आहे.
हे वाचा - जास्तीचं भाडं नाकारल्याने उगवला सूड; मुंबईतील तरुणीसोबत उबेर एजंटचं भयंकर कृत्य
शेअर बाजारातही तेजी
भारतीय शेअर बाजारातही तेजीचं वातावरण आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनं नुकताच 18 हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोना काळातील पहिली आपटी खाल्ल्यानंतर उसळून वर आलेला बाजार नवनवे विक्रम आणि उच्चांक रचत असल्याचं चित्र आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं 60 हजारांचा पल्ला पार केला आहे.
वित्त मंत्रालयानं आर्थिक सुधारणांचा वेग कमालीचा असल्याचं म्हटलं असून पुढील दोन महिन्यांत हा वेग कमालीचा वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतातील गुंतवणूकदेखील वाढत चालली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.