'...तर लॉकडाऊन म्हणजे बुलेटशिवाय बंदुक', प्रसिद्ध भारतीय डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

'...तर लॉकडाऊन म्हणजे बुलेटशिवाय बंदुक', प्रसिद्ध भारतीय डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

भारतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे, कोव्हिड-19च्या कमी होणाऱ्या चाचण्या.

  • Share this:

कोलकाता, 13 एप्रिल : भारतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या 9 हजारांजवळ पोहचली आहे. यात 273 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे, कोव्हिड-19च्या कमी होणाऱ्या चाचण्या. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिपोर्टच्या (ICMR) अहवालानुसार 12 एप्रिलपर्यंत 1 लाख 81 हजार लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातील 8 हजार 312 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. भारतात लॅबची संख्या वाढत असली तरी, केवळ 15-20% चाचण्या केल्या जात आहे.

भारतातील प्रसिद्ध डॉक्टर कुणाल सरकार यांनी ही बाब गंभीर असल्याचे म्हंटले आहे. कुणाल यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित, जर खासगी लॅबना परवानगी देण्यात आली आहे, तर चाचण्या का केल्या जात नाही आहेत? आपल्याकडे किटही पुष्कळ आहेत, तरी चाचण्या होत नसतील तर हे गंभीर आहे, असा इशारा दिला. कुणाल यांनी य़ा परिस्थितीचे वर्णन चाचण्यांशिवाय लॉकडाऊन म्हणजे बुलेटशिवाय बंदूक, असे केले आहे. जर चाचण्या होत नसतील तर लॉकडाऊनचा काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले. कुणाल सरकार यांचीही ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-दारूची दुकानं उघडणार! काँग्रेसचं सरकार असलेल्या 'या' राज्यात होणार निर्णय

LOCKDOWN WITHOUT TESTING = RIFLE WITHOUT BULLETS

Posted by Kunal Sarkar on Sunday, April 12, 2020

याआधी सुप्रीम कोर्टाने खाजगी लॅबमध्येही कोव्हिड-19ची चाचणी सुरू करण्यात सांगितले होते. तसेच, या चाचणीसाठी कोणतेही मुल्य आकारले जाणार नाही. अशा परिस्थितीतही भारतात कमी चाचण्या होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुणाल यांनी, यामुळे वैद्यकिय कर्माचारी आणि लोकांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळं कृपया चाचण्या वाढवा, असे आवाहन सरकारला केले आहे.

वाचा-पोलीस चौकीवर RSS कार्यकर्ते तैनात? व्हायरल झालेल्या फोटोवरून वाद चिघळला

भारतात 9 हजारांच्या जवळ प्रकरणे

देशात कोरोनाबाधितांची संख्या जवळजवळ नऊ हजारांवर गेली आणि गेल्या 24 तासांत संसर्गाचे 918 नवीन रुग्ण आढळले. यापूर्वी शनिवारी एक हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली. आरोग्य देखरेखीसाठी वाढती मागणी असतानाही केंद्र सरकारने म्हटले आहे की, ते सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोविड -19ची चाचणी क्षमता वाढवित आहे. राज्यांकडून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे, आत्तापर्यंत देशात कोरोना विषाणूची 8,933 प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 296 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 981 लोक बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

वाचा-खूशखबर! आता 90 दिवसांत कोरोनावर लस मिळणार, 'या' देशाने केला दावा

First published: April 13, 2020, 10:44 AM IST

ताज्या बातम्या