तुमच्या खिशातील नोटा तर चायनामेड नाहीत ना?

तुमच्या खिशातील नोटा तर चायनामेड नाहीत ना?

भारतीय नोटा चीनच्या प्रेसमध्ये छापल्या जात असल्याचं वृत्त चिनी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानं एकच खळबळ उडालीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : चायनीज खाद्यपदार्थ आणि चायनामेड वस्तू तर अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनल्या आहेत. मात्र, आता तुमच्या खिशातील नोटा तर चायनामेड नाहीत ना? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण भारतीय नोटा चीनच्या प्रेसमध्ये छापल्या जात असल्याचं वृत्त चिनी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानं एकच खळबळ उडालीय. 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट' नं हा दावा केलाय. आता या विषयावरूनही राजकारण पेटलं असून, सरकारनं याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसनं केलीय.

भारतीय चलनी नोटांची छपाई चीनमधील प्रेसमध्ये होत असल्याचं वृत्त चिनी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानं ही खळबळ उडाली आहे. भारतीय चलनातील नोटांची चीनच्या प्रेसमध्ये छपाई होते की नाही? त्याबाबत सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

भारतासह नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, थायलंड आदी देशांमधील चलनी नोटा चीनमधील करन्सी प्रेसमध्ये छापण्यात येत असल्याचा दावा 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'मधील वृत्तात करण्यात आला आहे. भारतीय चलनी नोटांची छपाई खरच चीनमध्ये होत आहे का? याबाबत काँग्रेसनं स्पष्टीकरण मागितलं असलं तरी, सरकारकडून मात्र अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मात्र, यावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.

'भारतीय चलनी नोटा चीनमध्ये छापण्यात येत असल्याच्या दाव्यात तथ्य असल्यास राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. तसंच पाकिस्तानला बनावट नोटा तयार करणं आणखी सोपं होईल. पीयूष गोयल आणि अरुण जेटली यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं' असंही थरूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2018 11:03 PM IST

ताज्या बातम्या