पाकिस्तानच्या बोटीतून 600 कोटींचं ड्रग्ज जप्त, भारतीय तटरक्षक दलाची कारवाई

पाकिस्तानच्या बोटीतून 600 कोटींचं ड्रग्ज जप्त, भारतीय तटरक्षक दलाची कारवाई

भारतीय तटरक्षक दलाने धाडसी कारवाई करत त्या बोटींचा पाठलाग केला आणि त्यांना जे सापडलं ते धक्कादायक होतं.

  • Share this:

अहमदाबाद 21 मे : भारतीय तटरक्षक दलाला मंगळवारी मोठं यश मिळालं आहे. दलाने केलेल्या कारवाईत एका पाकिस्तानी बोटीतून 600 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. गेल्या काही वर्षांमध्ये तटरक्षक दलाने केलेली ही सर्वात मोठी करावाई समजली जातेय. या कारवाईत 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

गुजरातच्या जाखो किनाऱ्याजवळ तटरक्षक दलाने ही कारवाई केली. पाकिस्तानच्या 'अल मदिना' या मच्छिमार बोटीतून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ येत असल्याची गुप्त सूचना तटरक्षक दलाला मिळाली होती. त्यानंतर तटरक्षक दलाने कारवाईची तयारी केली. पाकिस्तानजवळच्या समुद्रातल्या हद्दीत काही संशयीत बोटी तटरक्षक दलाला आढळून आल्यात.

त्यानंतर तटरक्षक दलांच्या बोटींनी त्या पाकिस्तानी बोटींचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतलं. या बोटींची जेव्हा झडती घेण्यात आली तेव्हा त्यात लपवलेली ड्रग्जची 194 पाकीटं सापडली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 600 कोटी असल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या 13 जणांची चौकशी सुरू असून भारतीय तटरक्षक दलालाच्या हाती महत्त्वाची माहिती लागण्याची शक्यता आहे.

अशाच तस्करीच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांना आर्थिक पुरवढाही होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असतो. त्यामुळे तटरक्षक दलाला जास्त काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय अशाच मार्गाने भारतात शस्त्रास्त्र पोहोचविण्याची शक्यताही गेली अनेक वर्ष व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईवर हल्ला करणारा कसाब हा अशाच एका बोटीतून पाकिस्तानातून मुंबईच्या किमाऱ्यावर आला होता.

ठिसाळ सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक लोकांना आणि मच्छिमारांना हाताशी धरून दहशतवादी मुंबईत शिरले होते. या सगळ्या घटना लक्षात घेऊन तटरक्षक दल आणि नौदल जास्त काळजी घेत आहेत.

Tags:
First Published: May 21, 2019 04:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading