मुंबई, 18 मे : भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) देशाच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करण्यासोबतच समुद्र आणि किनाऱ्यांवरील विविध आपत्तींमध्ये नागरिकांना वाचवण्याचे कामही करत असते. आताही तौक्ते वादळामध्ये (CycloneTauktae ) तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) अत्यंत महत्त्वपूर्ण जीवरक्षक कामगिरी केली आहे.
#CycloneTauktae #NationFirst @IndiaCoastGuard Chetak launched from Goa successfully rescued 02 DGLL employees stranded at Vengurla Rock Light House in a daring mission today amidst gusting winds and challenging weather conditions @DefenceMinIndia @shipmin_india @SpokespersonMoD pic.twitter.com/jMrFvlIAP2
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) May 18, 2021
दमण कोस्ट गार्ड एअर स्टेशनच्या चेतक हेलिकॉप्टरने सातपाटी येथील 138 जणांचे तर, गोव्यातील आणखी एका चेतकने वेंगुर्ला दीपगृह येथील दोन कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले. या थरारक शोर्याचा व्हिडिओ समोर आला आहे, तटरक्षक दलानं ट्विटकरून याचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
#CycloneTauktae #NationFirst @IndiaCoastGuard divers rescued 08 fishermen in distress off #Veraval #Gujarat. First aid provided and persons shifted to hospital by #ICG team @DefenceMinIndia @SpokespersonMoD @CMOGuj @Min_FAHD pic.twitter.com/GUAGMquica
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) May 18, 2021
कोस्ट गार्ड एअर स्टेशन दमण येथून निघालेल्या कोस्ट गार्ड हेलिकॉप्टर चेतकने सातपाटी जीएएल कन्स्ट्रक्टरच्या (Satpati GAL Constructor) समुद्रात जहाजावर अडकलेल्या सर्व 138 कर्मचाऱ्यांची सुटका केली. तटरक्षक दलाने अत्यंत जबाबदारीने आणि सुयोग्य व्यवस्थापनासह ही कामगिरी पार पाडली. यासह हे बचावकार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाले. तर, कोस्ट गार्ड एअर एन्क्लेव्ह गोवा येथून निघालेल्या आणखी एका चेतक हेलिकॉप्टरने वास्कोच्या उत्तरेकडे 38 समुद्री मैलांवर (Nautical miles) असलेल्या वेंगुर्ला दीपगृहातील दोन कर्मचाऱ्यांना वाचवले.
#CycloneTauktae #NationFirst Update on grounded barge GAL CONSTRUCTOR.Swift rescue operation in progress by two @IndiaCoastGuard chetak helicopters.50 crew airlifted and safely transferred to nearby Wadrai beach.Rescue operation continues@DefenceMinIndia @ONGC_ @SpokespersonMoD pic.twitter.com/Qm0w9qRbQz
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) May 18, 2021
हे वाचा - यांचं आपलं भलतंच! मुख्यमंत्र्यांचं Lockdown वाढवण्यासंबंधी Tweet ‘लैला-मजनू’च्या या कमेंटमुळे हिट
या सर्वांना यशस्वीरीत्या किनाऱ्यावर आणण्यात आले. तौक्ते वादळामुळे वाहणारे वेगवान वारे आणि बदलत्या हवामानामुळे खवळलेला समुद्र यामुळे येथील विद्युतदपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. तसेच, या दीपगृहाचेही मोठे नुकसान झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyclone, Indian army