मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतीय सैन्यात महिला अधिकाऱ्यांनाही मोठी संधी; संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी

भारतीय सैन्यात महिला अधिकाऱ्यांनाही मोठी संधी; संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी

**EDS: FILE PHOTO** New Delhi: In this Jan 17, 2015 file photo, all women contingent of Indian Army during the rehearsal for the Republic Day parade at Rajpath in New Delhi. The Supreme Court on Tuesday, Nov. 19, 2019, told the army to take a decision on permanent commission to eight women army officers who had approached the top court in 2010 against the bar on their absorption in the armed forces. (PTI Photo/Shahbaz Khan)(PTI11_19_2019_000240B)

आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. या निर्णयामुळे भारतीय सैन्यातही त्या चांगलीच कामगिरी बजावतील यात शंका नाही

  नवी दिल्ली, 23 जुलै : भारतीय सैन्यात महिलांसाठी स्थायी कमिशनबाबत संरक्षण मंत्रालयातर्फे अधिकृतपणे मंजुरी देण्यात आली आहे. गुरुवारी सरकारकडून जारी केलेल्या स्वीकृती पत्रानंतर आता सैन्यात विविध वरिष्ठ पदांवर महिलांना तैनात करण्यात येईल. या आदेशानुसार शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) अंतर्गत महिला अधिकाऱ्यांना भारतीय सैन्यात सर्व दहा भागात स्थायी कमिशनची परवानगी देण्यात आली आहे. हे वाचा-व्हिलचेअरवर असलेल्या भारतीय प्रतिष्ठाची ऑक्सफर्डपर्यंत भरारी; रचला इतिहास म्हणजेच आता आर्मी एअर डिफेंस, सिग्नल, इंजीनिअर, आर्मी एविएशन, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, इंजीनिअरिंग, आर्मी सर्विस कॉप्स, आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स आणि इंटेलिजेंस कॉर्प्समध्येही स्थायी कमिशन मिळू शकेल. यासह जज एंड एडव्होकेट जनरल, आर्मी एज्युकेशन कॉर्प्समध्येही ही सुविधा मिळू शकेल. या आदेशानंतर आता लवकरच परमनेंट कमिशन सिलेक्शन बोर्डकडून महिला अधिकाऱ्यांना तैनात करण्यात येईल. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. सैन्यातील महिला अधिकाऱ्यांच्या तैनातीसाठी सैन्याच्या मुख्यालयाकडून अनेक पाऊले उचलण्यात आली आहेत. सिलेक्शन बोर्डाकडून सर्व एसएससी (SSC) महिलांकडून ऑप्शन आणि सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर अॅक्शन सुरू करण्यात येईल. यामुळे महिला अधिकाऱ्यांना संघटनेत मोठी भूमिका निभावण्याचा अधिकार मिळाला आहे. याबाबत भारतीय सैन्याच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Women, Women officer

  पुढील बातम्या