नवी दिल्ली, 14 मे: भारतीय लष्कराच्या जवानांचा पोशाष अधिक स्मार्ट आणि आरामदायी करण्यात येणार आहे. आर्मी युनिफॉर्म मध्ये कोणते कोणते बदल केले जाऊ शकतात यासंदर्भात भारतीय लष्कराच्या मुख्यालयातून सर्व जवानांना आणि अधिकाऱ्यांना सूचना देण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यालयातील सेना भवनातून सर्व 11 विभागांना पत्र पाठवण्यात आले आहे.
मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यात भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांचा युनिफॉर्म बदलण्यासंदर्भात चर्चा झाली. हा युनिफॉर्म अधिक स्मार्ट आणि आरामदायी करण्यावर भर दिला जाणार आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अन्य देशांप्रमाणे शर्ट आणि पॅन्टचा कलर वेगवेगळा ठेवण्यात यावा अशी सूचना देखील करण्यात आली आहे. सध्या भारतीय लष्करातील युनिफॉर्ममध्ये खांद्यावर एका पट्टीवर लावण्यात आलेल्या स्टारमुळे संबंधित अधिकाऱ्याची रॅक लक्षात येते. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लष्कारच्या युनिफॉर्मवर छातीवर स्टार लावले जातात. भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांचा रॅक देखील अशाच प्रकारे दाखवली जावी अशी सूचना देखील आली आहे.
अन्य एका सूचनेनुसार कॉम्बेट युनिफॉर्ममध्ये वापरला जाणारा बेल्ट वगळण्यात यावा असे म्हटले आहे. यामुळे युनिफॉर्म अधिक स्मार्ट आणि आरामदायी होऊ शकले. त्याच बरोबर युनिफॉर्मसाठी वापरल्या जाणाऱ्या कापडा संदर्भात देखील सूचना करण्यात आली आहे. लष्करातील युनिफॉर्म बदलण्यासंदर्भात अनेक वेळा चर्चा केली जाते. युनिफॉर्म बदलण्यासंदर्भात अनेक सूचना देखील वारंवार केली जाते. पण या प्रक्रियेत बराच वेळ लागू शकतो. याआधी देखील भारतीय लष्कराच्या युनिफॉर्ममध्ये छोटे-छोटे बदल करण्यात आले आहेत. यात बूटासंदर्भातील बदल देखील करण्यात आला होता.
9 प्रकारचे युनिफॉर्म आहेत
भारतीय लष्करात सध्या 9 प्रकारचे युनिफॉर्म आहेत. या युनिफॉर्मचे चार विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या विभागात कॉम्बेल्ट युनिफॉर्म आहेत. दुसऱ्यामध्ये सेरिमोनियल, तिसऱ्यात पीस टाइम युनिफॉर्म तर चौथ्या मेस युनिफॉर्म आहे. यातील सेरिमोनियल युनिफॉर्ममध्ये 3 प्रकार आहेत. प्रत्येक युनिफॉर्मला स्वतंत्र नंबर देण्यात आले आहेत.
VIDEO: यशोमती ठाकूर यांचं पाण्यासाठी रौद्र रूप ,मुख्य अभियंत्याला धरले धारेवर