Home /News /national /

भारतीय लष्कराच्या नवा युनिफॉर्मविषयी सोशल मीडियावर वेगळीच चर्चा! उद्या ‘आर्मी डे परेड’मध्ये होणार अनावरण

भारतीय लष्कराच्या नवा युनिफॉर्मविषयी सोशल मीडियावर वेगळीच चर्चा! उद्या ‘आर्मी डे परेड’मध्ये होणार अनावरण

भारतीय लष्करातील (Indian Army) जवान, अधिकारी उद्यापासून (15 जानेवारी 2022) नवीन युनिफॉर्म (New Uniform) परिधान करणार आहेत. नवीन गणवेशात सैनिकांना अधिक सोयीस्कर आणि ऑपरेशनल अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 14 जानेवारी : भारतीय लष्करातील (Indian Army) जवान, अधिकारी उद्यापासून (15 जानेवारी 22) नवीन युनिफॉर्म (New Uniform) परिधान करणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीनं (NIFT) लष्कराच्या मदतीनं हा खास युनिफॉर्म तयार केला आहे. डिजीटल पॅटर्न (Digital Pattern) असणारा हा युनिफॉर्म अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून, तो वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानातही अनुकूल (Climate Friendly) ठरेल असा आहे. उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी होणाऱ्या ‘आर्मी डे परेड’मध्ये (Army Day Parade) भारतीय लष्कर या नव्या युनिफॉर्मचे अनावरण करणार आहे. सैनिकांना अधिक आरामदायी आणि कोणत्याही परिस्थितीत वावरण्यास अनुकूल ठरेल असा युनिफॉर्म देण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे. मनीकंट्रोलनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार करण्यात आलेला हा युनिफॉर्म 15 पॅटर्न, आठ डिझाईन्स आणि चार प्रकारच्या कापडाचा वापर करून विकसित करण्यात आला आहे. यामध्ये 70:30 या प्रमाणात कापूस (Cotton) आणि पॉलिस्टर (Polyster) यांचे मिश्रण वापरण्यात आलं आहे. याचं कापड हलकं आणि लवकर कोरडं होणारं आहे, त्यामुळे लढाईच्या प्रसंगात तसंच उन्हाळा आणि हिवाळ्यातही तो सैनिकांसाठी अधिक आरामदायी असेल. हा युनिफॉर्म अधिक टिकाऊ आहे. सोशल मीडियावर वेगळी चर्चा अनेक देशांच्या लष्करी युनिफॉर्म्सचं विश्लेषण करून त्यावर विचारमंथन केल्यानंतरच या नवीन युनिफॉर्मला अंतिम रूप देण्यात आलं आहे. मात्र, सोशल मीडियावर याची तुलना प्रतिबंधित श्रीलंकन बंडखोर संघटना लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या (LTTE) सदस्यांच्या युनिफॉर्मशी करण्यात आली. भारतीय लष्करानं असं कोणतंही साधर्म्य असल्याचं नाकारलं आहे. तर सोशल मीडियावर मुद्दाम चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. लष्कराच्या या नवीन युनिफॉर्मवर इमेज एडिटिंग फिल्टरचा वापर करून त्याची चुकीची प्रतिमा प्रसारित केली जात आहे, असंही सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे. मोठी बातमी! दिल्लीत गाझीपूरच्या मार्केटमध्ये IED स्फोटकांनी भरलेली बॅग सध्याच्या प्रथेप्रमाणे, भारतीय सैनिक बाजारातून कापड खरेदी करून आपला युनिफॉर्म शिवून घेऊ शकतो. मात्र, या नवीन युनिफॉर्मसाठी तयार करण्यात आलेले विशिष्ट डिजीटल पॅटर्न असलेले कापड खुल्या बाजारात उपलब्ध होणार नाही. निविदा प्रक्रियेद्वारे युनिफॉर्म तयार करून घेतले जाणार आहेत. सुमारे 13 लाख सैन्याचा युनिफॉर्म तयार करण्यासाठी खासगी आणि सरकारी पातळीवरील उद्योगांसाठी निविदा काढली जाईल, असं लष्करी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. तर माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, नवीन युनिफॉर्ममध्येही सध्याच्या युनिफॉर्मप्रमाणेच ऑलिव्ह ग्रीन (Olive Green) आणि मातीसारख्या (Soil) रंगांचे आणि शेड्सचे मिश्रण असून, त्याची टक्केवारीही पूर्वीप्रमाणेच आहे.
    First published:

    Tags: Indian army, Indian navy

    पुढील बातम्या