मराठी बातम्या /बातम्या /देश /

गॅस सिलेंडरच्या मदतीनं भारतीय लष्करावर हल्ल्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन

गॅस सिलेंडरच्या मदतीनं भारतीय लष्करावर हल्ल्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन

Terrorist attack Indian Army by Using IED and Gas Cylinder : भारतीय लष्करावर हल्ला करण्यासाठी दहशतवादी आता घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करण्याची तयारी करत आहेत.

  • Published by:  ram deshpande

नवी दिल्ली, 21 जून : जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पुलवामा येथे केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर दहशतवादी पुन्हा एकदा भारतीय लष्करावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहेत. पण, यावेळी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हा IED सोबत करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी रचलेला प्रत्येक प्लॅन भारतीय लष्करानं उधळून लावला. त्यानंतर आता नव्या प्लॅनच्या विचारात दहशतवादी आहेत. IEDसोबत सिलेंडरचा वापर करण्यासाठी दहशतवाद्यांना IED एक्सपर्ट मदत करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एकेकाळी लष्करासोबत काम करणारा IED एक्सपर्ट आता दहशतवादयांसोबत काम करत आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार जवानांच्या ताफ्यावर आदळली होती. त्यामध्ये 40 जवान शहिद झाले होते. त्यानंतर भारतानं पाक हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला होता.

काश्मीरबाबत असा आहे पाकिस्तानचा गेमप्लॅन; पण, भारतीय लष्करापुढे दहशतवादी नरमले

ऑपरेशन ऑल आऊट

दहशतवाद्यांच्या कारवाया या दिवसेंदिवस वाढत आहेत. पण, त्यांच्या या कारवायांना भारतीय जवान देखील चोख प्रत्युत्तर देत आहेत. ऑपरेशन ऑल ऑऊटच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो दहशतवाद्यांना यमसदनीस धाडण्यात आले आहे.

सीमेपलिकडून दहशतवादी कारवाया वाढत आहेत. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हद्दीत धुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. त्यामध्ये 200 ते 250 दहशतवादी ठार झाले होते.

या कारवाईनंतर देखील दहशतवादी कारवाया वाढत असून भारतीय लष्कर देखील दहशतवाद्यांना ठार करत आहेत.

चेन्नईमध्ये भीषण पाणीसंकट; तामिळनाडूनं नाकारली केरळची मदत

घाटीमध्ये अशांतीचा प्लॅन

दरम्यान, घाटीमध्ये अशांतीचा प्लॅन हा दहशतवाद्यांचा आहे. त्यासाठी दहशतवादी बुरहान वाणी सारख्या एका दहशतवाद्याच्या शोधात देखील आहेत. काश्मीर घाटीमध्ये अशांतता राहावी यासाठी दहशतवादी भारतीय लष्कराला देखील लक्ष्य करत आहेत.

VIDEO : काँग्रेस आमदार पोलिसांवर भडकले, सभागृहात केला बापाचा उल्लेख

First published:

Tags: Terror attack, Terrorist