पाकला दिलेल्या चोख प्रत्युत्तराचा VIDEO आला समोर; घुसखोरी करणाऱ्या पाकच्या चौक्या भारतीय लष्कराने उडवल्या
घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चांगला धडा शिकवला. अँटी टँक मिसाइलने पाकिस्तानी चौक्या उडवल्याचा VIDEO समोर आला आहे.
दिल्ली, 5 फेब्रुवारी : घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चांगला धडा शिकवला. भारताच्या लष्कराच्या अँटी टँक मिसाइलने पाकिस्तानी चौक्या उडवल्याचा VIDEO समोर आला आहे. भारतीय लष्करातील सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान सीमेजवळच्या कुपवाडा सेक्टरच्या समोरच्या चौक्यांना लष्कराने लक्ष्य केलं. पाकिस्तानने सीमेपलीकडून वारंवार केलेल्या गोळीबाराला दिलेलं हे उत्तर होतं. या नियंत्रित क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्याचं स्पष्ट दिसत आहेत. या हल्ल्याचा VIDEO ही समोर आला आहे.
#WATCH Indian Army Sources: Army troops recently used anti-tank guided missiles & artillery shells to target Pakistan Army positions opposite the Kupwara sector. This was in response to frequent ceasefire violations by Pakistan to push infiltrators into Indian territory in J&K. pic.twitter.com/oHuglG0iQL
पाकिस्तान सीमेपलीकडून दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. भारतीय हद्दीत घुसखोरांना घुसता यावं यासाठी सीमेपलीकडच्या पाकिस्तानी चौक्यांमधून वारंवार गोळीबार आणि बाँब हल्ले होत होते.
भारतीय लष्कराला यात गुंतवून दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसायला मदत केली जात होती. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र डागली आणि पाकिस्तानी चौक्यांच्या चिंध्या केल्या.
काश्मीर खोरं अस्वस्थ करणं हा या घुसखोरांचा उद्देश असू शकतो. काश्मीर खोऱ्यातल्या कुपवाडा सेक्टरसमोरच्या पाकिस्तानी चौक्या या हल्ल्यात उडवून देण्यात आल्या. पुलवामा हल्ल्याला आणि त्यापाठोपाठ सर्जिकल एअर स्ट्राइकला वर्षपूर्ती होत असताना पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्या आहेत.