जवान चंदू चव्हाण यांचा राजीनामा, लष्कराने म्हटलं बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही

जवान चंदू चव्हाण यांचा राजीनामा, लष्कराने म्हटलं बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही

पाकच्या तावडीतून सुटल्यानंतर अधिकारी संशयाने बघायचे, त्यांनी छळ केला असं म्हणत जवान चंदू चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : दोन वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या आणि त्यानंतर तीन महिन्यांनी सुटका झालेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांनी लष्कराचा राजीनामा दिला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी छळ केल्यानं आपण राजीनामा देत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर लष्कराकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारतीय लष्कराने चंदू चव्हाण यांच्याकडून वारंवार चुका झाल्याचं आणि नियमांचे उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे.

चंदू चव्हाण यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या पाच सुनावणी सुरू आहेत. अनेकदा समुपदेशनासाठी प्रयत्न करण्यात आले पण त्याच्या तक्रारी करण्याच्या सवयीनं सर्व वाया गेलं. कोणत्याही प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असंही लष्करातर्फे सांगण्यात आलं आहे.

भारतीय लष्कराने 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्यानंतर चंदू चव्हाण यांनी चुकून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला होता. तेव्हा चार महिने पाकच्या ताब्यात असताना त्यांचा भयंकर छळ करण्यात आला होता. चंदू चव्हाण हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे आहेत.

पाकिस्तानच्या ताब्यातून सुटल्यानंतर लष्करातील अधिकारी माझ्याकडे संशयानं बघत आहेत. यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं चंदू चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानमधून परतल्यानंतर मला चांगली वागणूक मिळाली नाही. सातत्यानं शिक्षा दिली जात होती. त्यामुळे मानसिक खच्चीकरण होतं होतं. या त्रासामुळे राजीनामा देत असून जर न्याय मिळाला नाही तर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही चंदू चव्हाण यांनी दिला आहे.

परीक्षा नंतरही देता येईल, पण झाडं तुटली तर..,'आरे'साठी कारे करणारी रणरागिणी, पाहा हा VIDEO

First published: October 6, 2019, 9:48 AM IST

ताज्या बातम्या