S M L

भारताचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, 5 चौक्या केल्या उद्ध्वस्त

भारतीय सैन्याने पाकच्या हद्दीतील नौशेरामध्ये पाच चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. या कारवाईचा व्हिडिओ भारतीय सैन्याने प्रसिद्ध केलाय.

Sachin Salve | Updated On: May 23, 2017 05:09 PM IST

भारताचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, 5 चौक्या केल्या उद्ध्वस्त

23 मे : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं जशास तसे चोख उत्तर दिलंय. भारतीय सैन्याने पाकच्या हद्दीतील नौशेरामध्ये पाच चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. या कारवाईचा व्हिडिओ भारतीय सैन्याने प्रसिद्ध केलाय.

सीमारेषेवर पाकिस्तानकडून कुरापत्या सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त केल्या होता. पण तरी पाक सैन्याकडून भारतीय चौक्या आणि गावांवर गोळीबार सुरूच होता. याला आज (मंगळवारी) भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकच्या हद्दीतील पाच चौक्या जमीनदोस्त केल्यात.  काश्मीरमध्ये शांतता हवीये पण पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय. पाकिस्तानचं सैन्य दहशतवाद्यांना मदत करते. पाक सैन्य गोळीबार करून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मार्ग मोकळा करून देते अशी माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल अशोक नारूला यांनी दिली.

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आपल्याकडील गावांचं मोठं नुकसान झालंय. नौगाम आॅपरेशनमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. हा आमच्या काऊंटर टेरिरिझमचा हा भाग होता असंही अशोक नारूला यांनी सांगितलं.भारतीय सैन्याच्या चोख कामगिरीचं काँग्रेसने भारतीय सैन्याचं कौतुक केलं. भारतीय सैन्य दमदार कामगिरी करतंय. पण आपलं सरकार काय करतंय ? अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2017 04:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close