पाकिस्तानी Whatsapp ग्रुपमध्ये भारतीय सैन्याधिकारी, लष्कराने जारी केला अलर्ट

पाकिस्तानी Whatsapp ग्रुपमध्ये भारतीय सैन्याधिकारी, लष्कराने जारी केला अलर्ट

भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला त्याच्या परवानगीशिवाय एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आलं. हा ग्रुप एका पाकिस्तानी नंबरच्या माध्यमातून चालवला जात होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : व्हॉट्सअ‍ॅपचा वापर किती सुरक्षित आहे याबदद्ल जगभरात चर्चा सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या आणखीही वेबसाइट्सवर हॅकर्सची नजर असते. आता पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांचं भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप वर लक्ष असतं. त्यामुळेच लष्कराने आपल्या अधिकाऱ्यांना अलर्ट जारी केलं आहे.

पाकिस्तानची नजर

लष्कराने आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपचं सेटिंग बदलावं, असं यामध्ये म्हटलंय. भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला त्याच्या परवानगीशिवाय एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आलं. हा ग्रुप एका पाकिस्तानी नंबरच्या माध्यमातून चालवला जात होता.

(हेही वाचा : नोकरीसाठी आता रोबो घेणार इंटर्व्ह्यू, या बँकेने केली नवी सुरुवात)

अधिकाऱ्याने घेतला स्क्रीनशॉट

Loading...

या लष्करी अधिकाऱ्याला ग्रुपमध्ये अ‍ॅड केल्यानंतर त्याने त्याचा स्क्रीन शॉट घेतला आणि तो ग्रुपमधून बाहेर पडला. यानंतर त्यांनी याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

याआधीही वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची परवानगी न घेता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आलं. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचं सेटिंग बदलून अशा प्रकारे ग्रुपमध्ये अ‍ॅड होण्यापासून बचाव करू शकता, असं लष्कराने अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे.

============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 06:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...