भारतीय सुरक्षा दलाची मोठी कारवाई! 3 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान, चार फॉरवर्ड पोस्ट उद्ध्वस्त

भारतीय सुरक्षा दलाची मोठी कारवाई! 3 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान, चार फॉरवर्ड पोस्ट उद्ध्वस्त

नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून होणार्‍या हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय सैनिकांनी आज मोठी कारवाई करण्यात आली.

  • Share this:

श्रीनगर, 10 जानेवारी: एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे सीमेपलीकडून कुरघोडी करणारे पाकिस्तानी सैनिक सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहेत. पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा एकदा सीमेपलिकडून तुफान गोळीबार करण्यात आला होता. त्याला भारतीय सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काश्मीरमधील राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाक सैन्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने 3 सैनिक ठार झाले आहेत. अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी पाकिस्तानी लष्कराच्या चार फॉरवर्ड पोस्ट्स उद्ध्वस्त केल्या आहेत. LOC वर पाकिस्तानी लष्करानं सीमा सुरक्षेच्या नियमाचं उल्लंघन करत तुफान गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर दिलं.

नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून होणार्‍या हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय सैनिकांनी आज मोठी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पाकिस्तानच्या 3 सैनिकांना ठार केले. यावेळी अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी झाल्याची देखील माहिती मिळाली आहे.रविवारी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचं नियोजन सुरू असतानाच भारतीय सैन्यानं पाकिस्तानी सैनिकांचा हाच डाव उधळून लावला आहे. रजौरी आणि नौशेरा परिसरात गोळीबार केल्यानं भारतीय सैन्यानं देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या दोन्ही ठिकाणहून गोळीबार थांबला असल्याची माहिती मिळाली आहे.

 

Published by: Kranti Kanetkar
First published: January 10, 2021, 2:35 PM IST

ताज्या बातम्या