लष्करी क्षमतांबाबत भारत अव्वल; 'हा' आहे पाकिस्तानचा क्रमांक

लष्करी क्षमतेचा विचार केल्यास भारत चौथ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान...

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 11:59 AM IST

लष्करी क्षमतांबाबत भारत अव्वल; 'हा' आहे पाकिस्तानचा क्रमांक

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: कोणत्याही देशाची ताकद ही त्या देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे आणि लष्करी बळ किती आहे यावर ठरत असते. अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास अमेरिका, चीन पाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. पण जेव्हा लष्करी ताकदीचा विचार केला जातो तेव्हा भारतीय लष्कर (Indian Army)देखील आघाडीवर असल्याचे दिसून येते. जगभरातील विविध देशांची लष्करी ताकद यासंदर्भात ग्लोबल फायरपॉवर्स(Global Firepower's 2019 Military Strength Ranking )ने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. तर भारत चौथ्या स्थानावर आहे. आशियात भारताने दुसरे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे उठल्या बसल्या भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानचा क्रमांक तळातला आहे.

ग्लोबल फायरपॉवर्सने लष्करा संदर्भातील 55 विविध आधारावर ही क्रमवारी निश्चित केली आहे. लष्करी क्षमतेबाबत भारत जगात दुसरा तर आशिया खंडात दुसऱ्या स्थानावर आहे. आशियात चीन पहिल्या स्थानावर आहे. भारतीय लष्करात जवळपास 34 लाख सैनिक आहेत. त्यामधील 13 लाख जवान सक्रीय आहेत. तर 2 कोटी 31 लाख नागरिक असे आहेत जे लष्करात दाखल होण्यास सक्षम आहेत. क्रमवारीत नेहमी प्रमाणे अमेरिकेने पहिले स्थान कायम राखले आहे. अमेरीकेची लोकसंख्या 33 लाख आहे. त्यापैकी 21 लाख नागरिक लष्करात आहेत. अमेरिकेनंतर लष्करी क्षमतेबाबत रशियाचा क्रमांक लागतो. रशियाने अमेरिकाला जोरदार टक्कर दिल्याचे दिसून येते. रशियाकडे 35 लाख सैनिक आहेत. त्यापाठोपाठ चीनचा क्रमांक लागतो. क्रमवारीत भारतानंतर फ्रान्सचा पाचवा क्रमांक लागतो.

पाकिस्तान पिछाडीवर...

या क्रमवारीत पाकिस्तान 15व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानकडे केवळ 12 लाख सैनिक आहेत. याचाच अर्थ पाककडे भारतापेक्षा निम्मे जवान आहेत. त्यातही 12 लाख जवानांपैकी साडेसहा लाख जवानच सक्रीय असल्याचे ग्लोबल फायरपॉवर्सने म्हटले आहे.

Loading...

आशियात देखील स्पर्धा...

आशिया खंडाचा विचार केल्यास चीन पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. तिसऱ्या स्थानावर पाकिस्तान आहे. या क्रमवारीत म्यानमार आणि बांगलादेशचा अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो. श्रीलंका सहाव्या तर नेपाळ आठव्या स्थानावर आहे. नेपाळकडे 95 हजार सैनिक आहे. 10व्या स्थानावर भूटान आहे. जागतीक क्रमवारीत भूटान सर्वात खाली आहे. भूटान 137व्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे केवळ 7 हजार सैनिक आहेत.

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 11:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...