बर्फात गाडलेल्या नागरिकाचे लष्कराच्या जवानांनी वाचवले प्राण, पाहा मन हेलावून टाकणारा हा Video

बर्फात गाडलेल्या नागरिकाचे लष्कराच्या जवानांनी वाचवले प्राण, पाहा मन हेलावून टाकणारा हा Video

गेल्य़ा अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीर भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे.

  • Share this:

श्रीनगर, 16 जानेवारी : गेल्य़ा अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीर भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. अनेक ठिकाणी हिमवादळाच्या घटनाही घडल्या आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही दिवसांपूर्वी हिमस्खलनात लष्कराचे काही जवान अडकले होते. या घटना सातत्याने घडत असून मंगळवारी इकबाल नावाच्या एका व्यक्तीला वाचविण्यात लष्कराच्या जवानांना यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील लाचीपुरा भागात झालेल्या बर्फवृष्टीमुशे इकबाल बर्फामध्ये गाडला गेला होता. यावर तातडीने कारवाई करीत लष्कराच्या जवानांनी त्याला बर्फातून काढले आहे. यासंबंधितचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. इकबालला बर्फातून काढल्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. लष्कराच्या बचावकार्यामुळे इकबालचे प्राण वाचले आहे. येथील पोलीस व सुरक्षादलांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी एका घटनेत जम्मू-काश्मीरमधील बर्फवृष्टी आणि हिमवादळामुळे 6 जवान शहीद झाले आहे. या हिमवादळात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

हिमवृष्टीमुळे नागरिक त्रस्त

गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर या भागात सातत्याने या घटना घडत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गांदरबल जिल्ह्यातील गगनगिर भागात झालेल्या  हिमस्खलनात पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या बचावकार्यात चार नागरिकांना वाचविण्यात यश आले आहे. दुसऱ्या एका घटनेत 29 वर्षांच्या बीएसएफ जवान हिमस्खलनात शहीद झाला. सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सहा लोकांना सुरक्षित वाचविण्यात आले, मात्र प्रयत्न करुनही एका कॉन्स्टेबलला वाचवता आलं नाही. हा जवान पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील राहणारा होता. तो 2011 मध्ये बीएसएफमध्ये रुजू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2020 11:18 AM IST

ताज्या बातम्या