S M L

भारतीय सैन्याने एलओसी पार करून केला 3 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

सोमवारी रात्री भारतीय लष्कराने सीमेपलीकडे जाऊन आणखी एक मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईत तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून एक सैनिक जखमी झाला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 26, 2017 10:45 AM IST

भारतीय सैन्याने एलओसी पार करून केला 3 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

26 डिसेंबर: गेल्यावर्षी पाकिस्तानी हद्दीत शिरून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सोमवारी रात्री भारतीय लष्कराने सीमेपलीकडे जाऊन आणखी एक मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईत तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून एक सैनिक जखमी झाला आहे.

तर  आज सकाळी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.  नूर मुहम्मद असं या दहशतवाद्यांचं नाव आहे.  पाकव्याप्त काश्मीरमधल्या रावलाकोटमध्ये कारवाई आहे.  रावलाकोटच्या रुख चाकरी सेक्टरमध्ये हल्ला करण्यात आला आहे.यात  पाकिस्तानचे 3 सैनिक ठार झाले आहे.  पाकिस्तानच्या आयएसआयकडूनही या कारवाईस  दुजोरा देण्यात आला आहे.   कारण नसताना भारताची ही आगळीक असल्याची भूमीका  आयएसआयने घेतली आहे.

पाकिस्तानच्या राजौरीमधल्या हल्ल्याचा भारताकडून बदला घेण्यात  आला आहे. पाकच्या हल्ल्यात मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झाले होते. राजौरीमधल्या हल्ल्यात 2 जवानांना वीरमरण आलं होतं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 10:45 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close