भारतीय लष्कर – दहशतवाद्यांमध्ये चकमक; बुरहान वाणीच्या गँगमधील या दहशतवाद्याचा खात्मा

भारतीय लष्कर – दहशतवाद्यांमध्ये चकमक; बुरहान वाणीच्या गँगमधील या दहशतवाद्याचा खात्मा

भारतीय लष्करानं बुरहान वाणीच्या गँगमधील प्रमुख दहशतवाद्याचा खात्मा केल्याची माहिती आता समोर येत आहे.

  • Share this:

शोपियन, 03 मे : भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यामध्ये चकमक सुरू आहे. यावेळी लष्करानं 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरलं असून जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. शोपियनमधील अधकारा इमामसाहिबा या ठिकाणी सध्या ही चकमक सुरू आहे. चकमकीमध्ये भारतीय लष्करानं लतिफ टायगर या बड्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. कारण, जवानांनी घेरलेल्या दहशतवाद्यांमध्ये लतिफ टायगरचा देखील समावेश होता. यामध्ये लतिफ टायगरसह दोन दहशतवादी ठार झाले असून एक जवान जखमी झाला आहे.

ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकणार फानी चक्रीवादळ; भुवनेश्वर,कोलकाता विमानतळ बंद

लतिफ हा काश्मीरमधील दहशतवादी बुऱहाण वाणीच्या टोळीतील आहे. बुऱहाण वाणीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्करानं बुऱहाण वाणी सोबत असलेल्या इतर दहशतवाद्यांचा देखील खात्मा केला. त्यापैकी लतिफ टायगर हा दहशतवादी बचावलेला होता. त्याचा आता खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे.

मागील काही दिवसांपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सतत चकमक सुरू आहे. आतापर्यंत अनेक टॉपच्या दहशतवाद्यांचा खात्मा हा लष्करानं केला आहे. सरकारनं देखील दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करा असे आदेश लष्कराला दिले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांना ठार केलेली आकडेवारी देखील शेकडोंच्या घरात आहे.

VIDEO : वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण मिळणार की नाही? चंद्रकांत पाटील म्हणतात..

First published: May 3, 2019, 8:37 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading