पुलवामा, 07 जून : जम्मू – काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय लष्करानं 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांमध्ये जम्मू – काश्मीर पोलिसांचे 2 SPO यांचा देखील समावेश आहे. दोन्ही SPO गुरूवारी संध्याकाळी सर्विस रायफल घेऊन फरार झाले होते. शबीर अहमद आणि सलमान अहमद अशी या दोन SPOची नावं आहेत. पुलवामा येथे दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली. त्यावेळी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ठार केलेले सर्व दहशतवादी जैश – ए – मोहम्मदचे दहशतवादी असल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी ( आज ) सकाळी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्करानं ही कारवाई केली.
दहशतवाद्यांनी ईदच्या दिवशीच केली जवानाची हत्या
भारतीय जवान, पोलिसांची कारवाई
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादविरोधी कारवाई पोलिस आणि भारतीय लष्कर यांनी संयुक्तपणे केली होती. कारवाईदरम्यान परिसरातील इंटरनेट सेवा देखील खंडित करण्य़ात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घराला घेरून दहशतवाद्यांचा खात्मा केला.
भारतीय वायुदल इस्रायलकडून घेणार 100 SPICE Bombs; Airstrike करताना वापरली होती हीच अस्त्रं
ऑपरेशन ऑल आऊट
जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात येत आहे. 2018मध्ये 250 पेक्षा देखील जास्त दहशतवाद्यांचा खात्मा हा लष्करानं केला आहे. तर, 2019मध्ये हाच आकडा 100 पर्यंत गेला आहे. सरकारकडून देखील दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मुभा भारतीय लष्कराला देण्यात आली आहे.
हिट लिस्ट तयार
दरम्यान, भारतीय लष्करानं दहशतवाद्यांची हिट लिस्ट देखील तयार केली आहे. यामध्ये टॉपच्या 10 दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे.
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा; चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी