नवी दिल्ली, 11 जुलै : भारत आणि पाकिस्तानचं सैन्य सीमेवर एकमेकांचे शत्रू म्हणून उभं ठाकलं तरी प्रत्यक्षात ती माणसंच आहेत याचा प्रत्यय एका घटनेमुळे आला. भारतीय लष्कराच्या माणुसकीचं दर्शन यातून घडलं.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका लहानग्याचा मृत्यू ओढवला होता. त्याचा मृतदेह किशनगंगा नदीतून वाहतवाहत भारताच्या हद्दीत आला. हा मुलगा गिलगिटमध्ये राहणारा होता. त्याच्या नातेवाईकांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी सोशल मीडियावरून सरकारला अपील केलं.
#Salute #IndianArmy - Army breaks protocol on humanitarian ground to handover body of child to #Pakistan. Body of 8 yr old Abid Sheikh of Gilgit Baltistan was retrieved from Kishanganga River by Indian Army troops. & today Indian Army handed over body at Gurez @adgpi pic.twitter.com/DjyI7vKNpa
— Kirandeep (@raydeep) July 11, 2019
नातेवाईकांनी केली विनंती
या लहानग्याचा मृतदेह आपल्याकडे सोपवावा, अशी विनंती त्यांनी सरकारला केली होती. त्यावरून भारतीय लष्कराने या चिमुकल्याचा मृतदेह त्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. या मुलाचं नाव आबिद शेख असं आहे. त्याचा मृतदेह बांदिपूर जिल्ह्यात किशनगंगा नदीत वाहात आलेला आढळला. भारतीय लष्कराने प्रोटोकॉल बाजूला ठेवून हा मृतदेह पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडे सोपवला.
प्रोटोकॉल ठेवले बाजूला
आबिद हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहत असल्याने पाकिस्तानी नागरिक होता. असं असलं तरी भारतीय लष्कराने प्रोटोकॉल बाजूला ठेवून या मुलाचा मृतदेह पाकिस्तानकडे सोपवला. सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवणाऱ्या या वर्दीतल्या जवानांच्या माणुसकीचं दर्शन या निमित्ताने घडलं.
=========================================================================================
बापाने मुलाला बंदुकीत भरायला लावल्या बुलेट्स, भलतेच संस्कार देणारा VIDEO व्हायरल