मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतमातेसाठी प्राणांची आहुती! सीमेवर लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण

भारतमातेसाठी प्राणांची आहुती! सीमेवर लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण

पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यावेळी झालेल्या चकमकीत 19 वर्षीय निखिल दायमा शहीद झाले.

अलवर, 30 जानेवारी : भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एका 19 वर्षीय जवानाला वीरमरण आलं आहे. पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यावेळी झालेल्या चकमकीत 19 वर्षीय निखिल दायमा शहीद झाले.

निखिल यांचं पार्थिव आज जम्मू-काश्मीरहून दिल्लीला रवाना होणार असून त्यानंतर त्यांच्या मूळ गावी सैदपूर येथे नेण्यात येणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवर निखिल यांना श्रद्धांजली वाहली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांशी चकमकीदरम्यान निखिल यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु त्यांना वीरमरण आलं. दोन दिवसांपूर्वी ते बेस कँपहून उरी येथे गेले होते. 19 वर्षीय निखिल यांची उरी येथे पहिली पोस्टिंग होती. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारीला सुट्टीवरून परत येऊन ते पुन्हा ड्युटीवर दाखल झाले होते. त्यानंतर आलेल्या या बातमीने कुटुंबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

First published: