बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमेवर हवाई दलाचा नवा 'मास्टर प्लान'

बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमेवर हवाई दलाचा नवा 'मास्टर प्लान'

'आकाश' ही स्वदेशी यंत्रणा आणि रशिया आणि इस्त्रायलकडून घेतलेल्या 'एअर डिफेन्स सिस्टिम्स'आता पाकिस्तान सीमेजवळ तैनात करण्यात येणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 14 मे : पुलमावा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातल्या बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या तळावर हल्ला करून तो तळ उद्धवस्त केला. त्यानंतर दोनच दिवसांनी पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. या घटना लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाने आता नवीन 'मास्टर प्लान' तयार केलाय. पाकिस्तानचा धोका आणि आक्रमणाची शक्यता लक्षात घेऊन हवाई सुरक्षा आणखी मजबूत करण्यात येणार असल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं.

भारताने पाकिस्तानात घुसून 26 फेब्रुवारीला हवाई हल्ले केले. तर पाकिस्तानने 28 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय हवाई दलाने गुजरात, राजस्थान आणि काश्मीरमधल्या पाकिस्तान सीमेवरच्या सर्वच परिस्थितीचा आढावा घेतला. नवे धोके, त्याचा मुकाबला करण्यासाठीच्या उपाययोजना, नव्या गरजा या सगळ्यांचा आढावा हवाई दलाने घेतला असून तातडीने उपाय योजना करण्यात येत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

पाकिस्तान सीमेवरची सुरक्षा आणखी मजबूत करण्यात येणार आहे. हवाई सुरक्षा यंत्रणा, अत्याधुनिक रडार, आणि विमानविरोधी सामुग्री आता पाकिस्तान सीमेच्या आणखी जवळ तैनात करण्यात येणार आहे. हवाई सीमांच्या सुरक्षेसाठी भारताने तयार केलेली 'आकाश' ही यंत्रणा आणि रशिया आणि इस्त्रायलकडून घेतलेल्या 'एअर डिफेन्स सिस्टिम्स'आता पाकिस्तान सीमेजवळ तैनात करण्यात येणार आहेत.

पाकिस्तानच्या अत्याधुनिक F16ला भारताच्या MIG 21 आणि सुखोई विमानांनी पिटाळून लावलं होतं. तर विंग कमांडर अभिनंदन याने पाकिस्तानचं F16 हे विमानही पाडलं होतं. बालाकोट इथल्या हवाई हल्ल्यात भारतीय हवाई दलाने आपल्या टार्गेटला उद्धवस्त केलं होतं. त्यामुळे जगभरच भारतीय हवाईदलाची प्रतिष्ठा वाढली आहे.

Tags:
First Published: May 14, 2019 04:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading