श्रीनगर, 25 जानेवारी : जम्मू-कश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील भारतीय सैन्याचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या अपघातात 2 पायलट गंभीर रुपात जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र उपचारादरम्यान Lt Col रिशब शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या कॅप्टन अंजनी कुमार सिंह व्हेंटिलेटरवर आहेत. (Indian army helicopter crashes Jammu Kashmir kathua)
कठुआचे SSP यांनी सांगितलं की, जम्मू-काश्मीरमधील लखनपूरमध्ये भारतीय सैन्यांचं ध्रुव हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातात हेलिकॉप्टरमधील पायलट गंभीर जखमी झाले. यातील एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारतीय सैन्याचं हे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मीर आणि पंजाब सीमेजवळ क्रॅश झालं आहे.
#UPDATE | India Army's Dhruv chopper crashed in Lakhanpur area (of Kathua) at about 7:15 pm today. Two pilots of the chopper were reportedly injured and are being treated in a hospital: OP Bhagat, Deputy Commissioner of Kathua, Jammu and Kashmir https://t.co/rGsDI625Zppic.twitter.com/wLi9RemDvt
सैन्याचं हे हेलिकॉप्टर रुटीन पेट्रोलिंग करण्यासाठी निघालं होतं. या हेलिकॉप्टरने पठाणकोट स्थित मामून कँटवरुन उड्डाण केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे पायलटांनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला होता. (Indian army helicopter crashes Jammu Kashmir kathua) हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर त्यात आग लागली. हेलिकॉप्टरमधून दोन्ही पायलटांना बाहेर काढण्यात आलं आहे. घटनास्थळी हजर असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर तारांना धडक देऊन जमिनीवर कोसळलं.