Home /News /national /

IAF Helicopter crash in Tamil Nadu : कुन्नूरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात

IAF Helicopter crash in Tamil Nadu : कुन्नूरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात

IAF Helicopter crash in Tamil Nadu : कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

IAF Helicopter crash in Tamil Nadu : कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

Breaking : कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत असल्याची माहिती

    तमिळनाडू, 8 डिसेंबर: तमिळनाडू येथील कुन्नूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर (IAF Mi-17V5 Helicopter crashes) कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (IAF Mi-17 V5 helicopter crashes near Coonoor Tamil Nadu) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळताच आग लागली. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहेत. या घटनेबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आहे. CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात; Ground Zero वरुन पहिला VIDEO न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवासी करत होते. यामध्ये बिपीन रावत, बिपीन रावत यांच्या पत्नी, लष्कराचे काही अधिकारी तसेच इतर सुरक्षारक्षक, कमांडोज उपस्थित होते. अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे त्या परिसरात घनदाट जंगल आहे. या घटनास्थळावरचे फोटोज आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Helicopter, Indian army, Tamil nadu

    पुढील बातम्या