S M L

पाकिस्तानच्या 'बॅट'चा हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला, एका दहशतवाद्याचा खात्मा

पाकच्या कुख्यात बाॅर्डर अॅक्शन टीम 'बॅट'ने हल्ला केला. मात्र, भारतीय सैन्याने हा हल्ला परतवून लावला. या हल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर दोन जण जखमी झाले आहे.

Sachin Salve | Updated On: Feb 19, 2018 10:12 PM IST

पाकिस्तानच्या 'बॅट'चा हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला, एका दहशतवाद्याचा खात्मा

19 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानने पुन्हा सीमारेषेचं उल्लंघन केलं. पाकच्या कुख्यात बाॅर्डर अॅक्शन टीम 'बॅट'ने हल्ला केला. मात्र, भारतीय सैन्याने हा हल्ला परतवून लावला. या हल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर दोन जण जखमी झाले आहे.

सैन्याचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनेंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी एकत्र असलेल्या गटाने रविवारी रात्री भारतीय सैन्यावर गोळीबार करत करमारा गुलपूरमध्ये घुसघोरीचा प्रयत्न केला. पण, भारतीय सैन्यांनी पाकचा हा नापाक हल्ला हाणून पाडला. या हल्ल्यात शस्त्राने सज्ज असलेल्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहे.

बॅट ही पाकिस्तानची स्पेशल फोर्समधील सैनिकांची एक तुकडी आहे. यात दहशतवाद्यांचाही समावेश असतो. सीमारेषेवर 1 ते 3 किलोमीटर आत घुसखोरी करण्यासाठी ही बॅट स्थापन करण्यात आलीये. सुरुवातीला ही बॅट गुप्तपणे काम करत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2018 10:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close