VIDEO : पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने घुसखोरी करत होते अतिरेकी, भारतीय लष्कराने केला पर्दाफाश

VIDEO : पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने घुसखोरी करत होते अतिरेकी, भारतीय लष्कराने केला पर्दाफाश

या व्हिडिओत पाकिस्तानी जवान आणि हत्यारं घेतलेल्या अतिरेक्यांचे मृतदेह दिसत आहेत. 31 जुलैच्या रात्री भारतीय लष्कराने काश्मीरमधल्या केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानची बॉर्डर अ‍ॅक्शन टीम म्हणजेच 'बॅट'च्या घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला.

  • Share this:

श्रीनगर, 9 सप्टेंबर : भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानी लष्कराचं एक पथक भारताच्या सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होतं. त्यावेळी भारतीय लष्कराने याचा पर्दाफाश केला. ही घटना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातली आहे. त्याचा व्हिडिओ आता प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या व्हिडिओत पाकिस्तानी जवान आणि हत्यारं घेतलेल्या अतिरेक्यांचे मृतदेह दिसत आहेत. 31 जुलैच्या रात्री भारतीय लष्कराने काश्मीरमधल्या केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानची बॉर्डर अ‍ॅक्शन टीम म्हणजेच 'बॅट'च्या घुसखोरीचा एक प्रयत्न उधळून लावला. या 'बॅट' पथकात पाकिस्तानी लष्कराच्या विशेष पथकाचे जवान आणि अतिरेकी होते, असं लष्कराने म्हटलं आहे.

या पथकातले जवान आणि अतिरेक्यांनी आघाडीवरच्या चौक्यांना लक्ष्य बनवायला सुरुवात केली पण भारतीय सैन्याच्या दक्ष जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. यामध्ये या पथकातले 5 ते 7 जण मारले गेले.

केरन सेक्टरमध्ये भारतीय चौकीच्या जवळ कमीत कमी 4 मृतदेह दिसले. हे मृतदेह पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या अतिरेक्यांचेही असू शकतात, असं लष्कराचं म्हणणं आहे.

या घटनेच्या आधीच अमरनाथ यात्रेला लक्ष्य बनवण्याचे प्रयत्न अतिरेक्यांनी केले होते. अतिरेकी आणि पाकिस्तानी लष्कराचे हितंसबंध असल्याचा हा पुरावा आहे, असं भारतीय लष्कराने या व्हिडिओद्वारे सिद्ध केलं.

================================================================================================

आदित्य यांच्यावर टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर, पाहा हा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: September 9, 2019, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading