PHOTO: 9 वर्ष IED स्फोटांपासून देशाला वाचवणाऱ्या कुत्र्याचं निधन

इमानदारपणे 9 वर्ष देशसेवा करणाऱ्या डच (DUTCH) कुत्र्याचा मृत्यू 11 सप्टेंबर रोजी झाला. दहशतवाद्यांविरोधाती अनेक मोहिमांमध्ये डचची विशेष कामगिरी होती.

  • Share this:

भारतीय सेनेच्या पूर्वी कमांडचा कुत्रा डचचा मृत्यू 11 सप्टेंबर 2019 रोजी झाला. त्याने तब्बल 9 वर्ष देशाची सेवा केली. या 9 वर्षात दहशतवाद्यांनी जमिनीत पेरलेले विस्फोटक, भूसुरूंग शोधून अनेक मोठ्या दुर्घटना होण्यापासून वाचवण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. डॉग स्क्वॉर्डमधील सर्वोत्तम जोखिम उचलणारा कुत्रा म्हणून डचची वेगळी ओळख होती.

या डचचा जन्म 3 एप्रिल 2010 रोजी मेरठच्या आरवीसी सेंटर अॅण्ड कॉलेजमध्ये झाला होता. हा कुत्रा भारतीय जवानांसाठी महत्त्वाचा होता.

दहशवाद्यांविरोधी मोहिमेत सर्वात जास्त काळ काम करणारा डच होता. ज्यामध्ये प्रत्येक मोहिमेत त्याला दिलेली जबाबदारी त्यांने इमानदारीनं योग्य पद्धतीनं पार पाडली. डचला स्फोटक आणि त्यात वापरण्यात आलेल्या वस्तुंच्या वासाबाबत विशेष ज्ञान होतं. वासाच्या मदतीनं त्याने अनेक स्फोटकं शोधून ती निकामी करण्यासाठी जवानांना मदत केली.

डिसेंबर 2014मध्ये आसाममधील गोलपारा इथे एका बसमध्ये आयईडी असल्याचं डचने निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आणि नागरिकांचा जीव वाचला. डचचा दोन वेळा ईस्‍टर्न कमांडकडून दोन वेळा सन्मान करण्यात आहे

नोव्हेंबर 2014 रोजी पंतप्रधान मोदींच्या आसाम दौऱ्याआधी अलीपुरद्वार इथे कामाख्या एक्स्प्रेसमध्ये 7 किलोग्राम आयईडी स्फोटकं असल्याचं डचने शोधून काढलं होतं. त्यामुळे अनेक नागरिकांचा जीव वाचला. दहशतवादी आणि घोसखोरांच्या कुरापतीपासून अनेक नागरिकांचे प्राण वाचवण्यात जवानांइतकाच डचचाही मोलाचा वाटा होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2019 10:26 AM IST

ताज्या बातम्या