सडेतोड प्रत्युत्तर! भारताकडून पाक लष्कराची चौकी उद्धवस्त, अनेकजण जखमी

सडेतोड प्रत्युत्तर! भारताकडून पाक लष्कराची चौकी उद्धवस्त, अनेकजण जखमी

  • Share this:

नवी दिल्ली, 6 मार्च : सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू- काश्मीरमधील सुंदरबनी आणि पूंछ येथे पाकिस्तानी सैन्याने बुधवारी (5 मार्च) पहाटेदेखील शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या हल्ल्याला भारतीय लष्करानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्युत्तराच्या कारवाईत भारतीय लष्कराने मेंढर सेक्टरजवळील बलनोई येथील पाकिस्तानी लष्कराची चौकी स्फोटकांनी उडवली. यामध्ये पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पहाटेच्या सुमारास सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. तर मंगळवारीदेखील (5 मार्च)तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना आपले जवानदेखील सडेतोड उत्तर देत आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, सोमवारी(4मार्च) पहाटे देखील 3 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. तसेच मोर्टार डागण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्येही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं

First published: March 6, 2019, 11:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading