PoK मधल्या अतिरेकी तळांवरच्या कारवाईबद्दल भारतीय लष्कराचं स्पष्टीकरण
भारतीय लष्कराने सीमेपलीकडे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे तळ आज उद्ध्वस्त केले या बातमीत तथ्य नसल्याचं DGMO लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : भारतीय लष्कराने सीमेपलीकडे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे तळ आज उद्ध्वस्त केले या बातमीत तथ्य नसल्याचं भारतीय लष्कराचे सरव्यवस्थापक लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह Director General Military Operations (DGMO) यांनी म्हटलं आहे.
'भारतीय लष्कराने आज कुठलीही कारवाई केली नाही', असं लष्करानेही स्पष्ट केलं आहे. पण त्याचबरोबर गेल्या आठवड्यातल्या कारवाईच्या बातमीबद्दल मात्र कुठलीही माहिती दिलेली नाही आणि ती कारवाई नाकारलेलीसुद्धा नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या आगळीकीला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईबद्दल साशंकता कायम आहे.
LoC के पार PoK में भारतीय सेना की कार्रवाई की खबरें फर्ज़ी हैं: भारतीय सेना के सैन्य संचालन महानिदेशक लेफ्टिनेंट जनरल परमजीत सिंह (फाइल फोटो) pic.twitter.com/edlKJ3B1mR
मागच्या आठवड्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष ताबारेषेवर कुरापती काढत भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पुन्हा एकदा ताबारेषेपलीकडे थेट मारा करत पाकव्याप्त काश्मीरमधले लाँचिंग पॅड उद्ध्वस्त केले. थेट लक्ष्य साधून मारा करत (with pin point accuracy)केलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानचे 8 सैनिक मारले गेले अशा बातम्या अनेक वृत्त वाहिन्यांनी गुरुवारी दिल्या. त्याबद्दल लष्कराच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलं.
सरकारी सूत्रांच्य हवाल्याने देण्यात आलेल्या या बातम्यांमध्ये, पाकव्याप्त काश्मीरमधले अतिरेकी तळ भारताने उद्ध्वस्त केल्याचं म्हटलं होतं. काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तानने ताबा रेषेपाशी गोळीबार सुरू केला होता. ताबारेषेवर भारतीय सैन्याला गुंतवून ठेवत दहशतवादी भारतीय हद्दीत घुसवण्याचा डाव भारताने हाणून पाडला. यामध्ये भारताचे 5 सैनिक धारातीर्थी पडले. यात महाराष्ट्राचे दोन सुपुत्रही शहीद झाले होते.
पाकिस्तानी सैन्याने गेल्या आठवड्यात काश्मीर खोऱ्यात केलेल्या गोळीबारामध्ये काश्मिरी नागरिकही जखमी झाले होते. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात 21 निरपराध नागरिकांनी पाकिस्तानच्या गोळीबारात जीव गमावला होता.