Home /News /national /

सलाम! लष्करानं विक्रमी वेळेत उभारले 2 पूल, अमरनाथ यात्रेचा मार्ग मोकळा, VIDEO

सलाम! लष्करानं विक्रमी वेळेत उभारले 2 पूल, अमरनाथ यात्रेचा मार्ग मोकळा, VIDEO

भारतीय लष्करानं (Indian Army) साऱ्या देशाला अभिमान वाटावी अशी कृती पुन्हा एकदा केली आहे

    मुंबई, 3 जुलै : भारतीय लष्करानं (Indian Army) साऱ्या देशाला अभिमान वाटावी अशी कृती पुन्हा एकदा केली आहे. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) मार्गावरील दोन पूल भूस्खलनामुळे वाहून गेले होते. बालटाल मार्गावरील हे पूल वाहून गेल्यानं अमरनाथ यात्रेच्या मार्गात विघ्न निर्माण झाले होते. त्यानंतर लष्करानं विक्रमी वेळेत हे दोन्ही पूल पुन्हा एकदा उभारले आहेत. जवानांनी गुरूवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री काम करून यात्रेचा मार्ग सुरक्षित केला आहे. न्यूज एजन्सी 'एनएनआय' नं दिलेल्या वृत्तानुसार तापमानात अचानक वाढ झाल्यानं बालटाल मार्गावरील कालीमाता जवळील नाल्यांमध्ये पूर आला होता. या पुरात हे दोन्ही पूल वाहून गेले. त्यानंतर प्रशासनानं लष्कराच्या चिनार कोर विभागाला हे पूल पुन्हा उभारण्याची विनंती केली. चिनार कोरनं तातडीनं पूल बांधनीचं काम हाती घेतले. यावेळी हेलिकॉप्टर, खेचरांसह स्वत: सैनिकांनीही आवश्यक सामान वाहून नेलं. त्यानंतर इंजिनिअर रेजिमेंटनं खराब हवामान आणि अंधाराच्या अडथळ्यांचा सामना करत हा पूल पुन्हा एकदा उभारला. त्यामुळे अमरनाथ यात्रा सुरू झाली. Agniveer Recruitment: आर्मीनंतर आता इंडियन नेव्हीने दिली खूशखबर; असा भरा अर्ज अमरनाथ यात्रा 30 जून रोजी सुरू झाली असून पहिल्या तुकडीमध्ये 2750 यात्रेकरूंचा टप्पा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दर्शनासाठी रवाना झाला आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Indian army, Video viral

    पुढील बातम्या