लष्कर प्रमुख नरवणे यांचं मिशन ‘सौदी’, पाकिस्तानला मिळणार मोठा धक्का

लष्कर प्रमुख नरवणे यांचं मिशन ‘सौदी’, पाकिस्तानला मिळणार मोठा धक्का

संरक्षण संबंध सुधारणे आणि व्दिपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी लष्कर प्रमुखांच्या स्तरावरचा पुढाकार हा भारताच्या परराष्ट्र धोरणातला महत्त्वाचा बदल मानला जातोय.

  • Share this:

नवी दिल्ली 08 डिसेंबर: लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे (Army chief Gen MM Naravane) यांच्या  आठवडाभराच्या विदेश यात्रे (Foreign Tour) ला मंगलवारपासून सुरूवात झाली. ते या सात दिवसांमध्ये UAE (United Arab Emirates-UAE) आणि सऊदी अरेबियला (Saudi Arabia) भेट देणार आहेत. भारताच्या लष्कर प्रमुखांची या देशांची ही पहिलीच भेट असून हा दौरा ऐतिहासिक समजला जात आहे. लष्करानेही एक पत्रक काढून मनोज नरवणे यांचा हा दौरा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे.

या वर्षातली नरवणे यांचा हा तिसरा विदेश दौरा आहे. ते या दौऱ्यात आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी आणि इतर नेत्यांची चर्चा करणार आहे. दोन्ही देशांमधले संरक्षण संबंध दृढ करण्याचा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

काही वर्षांपर्यंत सौदी अरेबिया हा पाकिस्तानचा घट्ट मित्र होता. आर्थिक मदतही पाकिस्तानला सौदीकडून मोठ्या प्रमाणात होत असे. मुस्लिम देशांच्या संघटनेतही पाकिस्तान सौदीच्या मदतीने भारत विरोधी अजेंडा राबवत होता. मात्र गेली काही वर्ष सौदी आणि पाकिस्तानचं बिनसलं आहे.

त्यामुळे सौदीशी असलेले संबंध दृढ करण्यासाठी लष्कर प्रमुखांचा हा दौरा पाकिस्तानला मोठा धक्का मानला जात आहे. नरवणे यांनी या आधी नेपाळचा दौरा केला होता. त्यानंतर ते मालदीवलाही गेले होते. सोदी अरेबिया आणि युएईला भारत काही संरक्षण साहित्य आणि रायफल्सही विकण्याची शक्यता आहे.

संरक्षण संबंध सुधारणे आणि व्दिपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी लष्कर प्रमुखांच्या स्तरावरचा पुढाकार हा भारताच्या परराष्ट्र धोरणातला महत्त्वाचा बदल मानला जातोय. छोट्या विकसित देशांना भारत संरक्षण साहित्याचा पुरवढा करत असतो. त्यात भारताला वाढ करायची आहे. ते प्रयत्न यशस्वी झाले तर भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरवणे यांच्या या विदेश दौऱ्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 8, 2020, 6:12 PM IST

ताज्या बातम्या