भारतीय लष्कराची मोठी कारवाई, POKमध्ये घुसून दहशतवादी तळ केले नष्ट

भारतीय लष्कराची मोठी कारवाई, POKमध्ये घुसून दहशतवादी तळ केले नष्ट

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे 30 किलोमीटर आत घुसून लष्कराने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.याआधी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आणि यात्रेकरूंना परत पाठवण्यात आलं.

  • Share this:

श्रीनगर, 3 ऑगस्ट : भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे 30 किलोमीटर आत घुसून लष्कराने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.याआधी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आणि यात्रेकरूंना परत पाठवण्यात आलं.

भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या नीलम झेलम जलविद्युत प्रकल्पाचंही नुकसान झालं. या प्रकल्पातून 400 ते 500 मेगावॅट वीजनिर्मिती होते. पाकिस्तानमधल्या पंजाब आणि अन्य राज्यांमध्येही इथूनच वीजपुरवठा होत असतो. त्यामुळेच या प्रकल्पाचं काही नुकसान झालं तर पाकिस्तानचा मोठा भाग अंधारात बुडण्याची भीती आहे.

भारतीय लष्कराच्या या कारवाईबद्दल पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये क्लस्टर बॉम्बचा उपयोग केल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे, असं पाकिस्तानने म्हटलं आहे. प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाच्या रक्तात काश्मीर आहे. त्याचबरोबर काश्मीरमधल्या लोकांची स्वातंत्र्याची लढाई यशस्वी होईल, अशीही प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सुरुंग पेरून हल्ला घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा कट होता. त्यामुळे सरकारने अमरनाथ यात्रेकरूंना काश्मीरमधून परत जाण्याचा आदेश दिला. अमरनाथ यात्रेच्या रस्त्यालर भारतीय लष्कराने अमेरिकी स्नायपर रायफलही हस्तगत केल्या. अतिरेक्यांविरुद्धची लष्कराने आपली मोहीम तीव्र केली आहे.

याच कारवाईचा एक भाग म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून लष्कराने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

================================================================================

VIDEO : ... आणि धुवांधार पावसात जीव धोक्यात घालून प्रवासी ट्रॅकवरून धावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 07:51 PM IST

ताज्या बातम्या