भारतीय लष्कर, PSUs आणि UGC इथे नोकऱ्या उपलब्ध, जाणून घ्या अधिक माहिती

भारतीय लष्कर, PSUs आणि UGC इथे नोकऱ्या उपलब्ध, जाणून घ्या अधिक माहिती

अनेक सरकारी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत. जाणून घ्या कुठे आहे संधी

  • Share this:

मुंबई, 04 एप्रिल : सध्या सरकारी नोकऱ्यांची मागणी वाढलीय. नुकतेच रेल्वेमधल्या 1.3 लाख जागांसाठी 2.01 कोटी अर्ज आले होते.  Centre for Monitoring Indian Economy (CMIE)च्या रिपोर्टनुसार फेब्रुवारीत बेरोजगारी 7.2 टक्क्यांनी वाढलीय. अनेक सरकारी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत. जाणून घ्या कुठे आहे संधी

भारतीय लष्कर

भारतीय लष्करात रांची इथे 1 एप्रिलपासून मोठ्या प्रमाणावर भरती सुरू झालीय. यात उमेदवाराला शारीरिक आणि वैद्यकीय टेस्ट द्यावी लागेल. त्यानंतर एन्टरन्स परीक्षाही द्यावी लागेल. त्याची तारीख लवकरच घोषित होईल. 15 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर माहिती मिळू शकते.

IDBI बँक

IDBIनं त्यांच्या वेबसाइटवर 900 जागांसाठी अर्ज मागवलेत. त्यात 515 अॅसिस्टंट मॅनेजर पदं, 309 एक्झिक्युटिव्ह पदं आणि 120 आॅफिसर्स पदांसाठी अर्ज मागवलेत. तुम्ही idbi.com यावर आॅनलाइन अर्ज करू शकता.

शेवटची तारीख आहे 15 एप्रिल. प्रीलिमिनरी परीक्षा आहे 16 मे रोजी. SC, ST आणि OBC साठी खास ट्रेनिंग 6 मे ते 11मेच्या दरम्यान होईल.

एक्झिक्युटिव्ह पदाचा पगार फिक्स आहे. पहिल्या वर्षी  22 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 24 हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी 27 हजार रुपये आहे.

सिंडिकेट बँक

या बँकेनं 129 स्पेशॅलिस्ट आॅफिसर पदासाठी अर्ज मागवलेत. syndicatebank.in या वेबसाइटवर आॅनलाइन अर्ज करायची शेवटची तारीख आहे 18 एप्रिल 2019. 12. 28 लाख ते 9.75 लाख रुपये पगार आहे.

युजीसी ( UGC )

युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशननं डेप्युटी सेक्रेटरी आणि एज्युकेशनल आॅफिसर या पदांसाठी अर्ज मागवलेत. सहा जागा आहेत. 5 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत अॅप्लिकेशन प्रोसेस सुरू आहे.

उमेदवारांनी हार्ड काॅपी मुख्य आॅफिसमध्ये पाठवायची. त्यासाठी अंतिम तारीख आहे 12 एप्रिल 2019. उमेदवारांनी पत्रावर applying for the post of … असं लिहावं.

ओएनजीसी ( ONGC )

E1 लेव्हल पोस्टसाठी 785 पदांवर अर्ज मागवलेत. जवळजवळ 19.48 लाख रुपये पगार आहे.  Assistant Executive Engineer, Chemist, Geologist, Geophysicist, Materials Management Officer, Programming Officer आणि Transport Officer ही पदं भरणं आहे.

RITES

RITES हा विभाग रेल्वेच्या अखत्यारित येतो. 40 पदं भरायची आहेत. rites.com यावर तुम्ही अर्ज भरू शकता. आॅनलाइन प्रोसेस सुरू आहे आणि शेवटची तारीख आहे 16 एप्रिल. पगार 40 हजार ते 1.40 लाख रुपये आहे.

VIDEO: कार्यकर्त्यांना चुचकारण्यासाठी एकनाथ शिंदेंनी टोचले पाटलांचे कान

First published: April 4, 2019, 1:47 PM IST
Tags: armyjobs

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading