लष्कर आणि हवाई दल 'हाय अलर्ट'वर, काश्मिरात पाकिस्तान कुरापत काढणार?

लष्कर आणि हवाई दल 'हाय अलर्ट'वर, काश्मिरात पाकिस्तान कुरापत काढणार?

हा निर्णय घेण्याच्या आधीच केंद्र सरकारने सुरक्षा दलाच्या 100 अतिरिक्त कंपन्या राज्यात तैनात केल्या आहेत. इंटरनेट, फोन, टीव्ही या सेवाही तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 5 ऑगस्ट : जम्मू आणि काश्मीरला असलेले विशेष राज्याचा दर्जा काढण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय. बदलत्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तान काश्मीरमध्ये कुरापत काढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे लष्कराला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीमेवरही पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळेही अधिक दक्षता बाळगण्यात येत आहे. हा निर्णय घेण्याच्या आधीच केंद्र सरकारने सुरक्षा दलाच्या 100 अतिरिक्त कंपन्या राज्यात तैनात केल्या आहेत. इंटरनेट, फोन, टीव्ही या सेवाही तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. तर काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय.

Article 370 : अमित शहांनी एकाच दगडात असे मारले अनेक पक्षी

असे होतील राज्यात बदल

केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यात आता काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. ते बदल असे आहेत, जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांचा दुहेरी नागरिकत्व संपणार. इतर राज्यांप्रमाणेच तेही भारताचे नागरिक होतील, आता देशातल्या इतर राज्यांमध्ये नागरिक जम्मू आणि काश्मीरमध्ये जमीन आणि संपत्ती घेऊ शकतील,  केंद्र सरकारच्या सर्व कायद्यांची आता जम्मू आणि काश्मीरमध्ये थेट अंमलबजावणी होईल. जम्मू आणि काश्मीरसाठी वेगळे कायदे करण्याची गरज राहणार नाही.  कलम 360 नुसार केंद्र सरकार आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकते.  आत्तापर्यंत राज्याचा आणि केंद्राचा असे दोन राष्ट्रध्वज होते. आता मात्र फक्त तिरंगा हा एकच ध्वज असेल देशातल्या इतर राज्यांप्रमाणे जम्मू आणि काश्मीरमध्ये आता दर पाच वर्षांनी निवडणुका होती. आधी दर सहा वर्षांनी निवडणुका होत होत्या. राज्यातलं पोलीस दल आता केंद्राच्या अधिकारात येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि काश्मीर खोऱ्यात शाखा उघडता येतील. आता खोऱ्यातही हिंदू आमदार निवडून येऊ शकतील.

अमित शहांच्या भाषणानंतर पाकिस्तानी शेअर बाजार कोलमडला; कोट्यवधी बुडाले

काँग्रेसला झटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्याने देशात राजकीय वादळ निर्माण झालंय. काही विरोधी पक्षांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलंय. तर  NDAतला भाजपचा मित्रपक्ष असलेल्या नितिश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने या निर्णयाला विरोध केलाय. काँग्रेसनेही या निर्णयाला जोरदार विरोध केलाय. काँग्रेसने या विधेयकावर मतदान होणार असल्याने राज्यसभेत सर्व खासदारांनी उपस्थित राहावं यासाठी Whip काढायला त्यांचे मुख्य प्रतोद भुवनेश्वर कलिता यांना सांगितलं होतं. मात्र पक्षाच्या या निर्णयाला कलिता यांनी विरोध करत थेट राजीनामाच दिलाय. मी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्विट कलीता यांनी केलाय.

असं आहे PoK : पाकिस्तान ज्याला 'आझाद काश्मीर' म्हणतं ते आहे इतकं सुंदर!

कलीता हे आसाममधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. काँग्रेसने कलम 370 हटविण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला होता. हा निर्णय योग्य असून काँग्रेसने केलाला विरोध चुकीचा असल्याचं कलिता यांनी म्हटलं आहे. या निर्णयाला विरोध करत काँग्रेसचं नेतृत्व पक्षाला आणखी रसातळाला नेत असल्याचा आरोपही कलिता यांनी केलाय. कलिता यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला जोरदार हादरा बसला आहे.

First published: August 5, 2019, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading