15,500 फुटांवर अडकलं होतं वायुसेनेचं चालक दल, भारतीय लष्कर आणि IAF ने केली अशी केली सुटका

15,500 फुटांवर अडकलं होतं वायुसेनेचं चालक दल, भारतीय लष्कर आणि IAF ने केली अशी केली सुटका

भारतीय सैन्य आणि भारतीय वायुसेनेने समुद्रसपाटीपासून 15,500 फुटांवर अडकलेल्या आएएफच्या चालक दलाचे रेस्क्यू ऑपरेशन मोठी जोखीम पत्करत पार पाडले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मे : भारतीय सैन्य (Indian Army) आणि भारतीय वायु सेना (IAF) यांंनी उत्तर सिक्कीममध्ये अत्यंत जोखमीची आणि मोलाची कामगिरी पार पाडली आहे. भारतीय सैन्य आणि भारतीय वायुसेनेने समुद्रसपाटीपासून 15,500 फुटांवर अडकलेल्या आएएफच्या चालक दलाला वाचवले आहे. बर्फाच्छादित असणाऱ्या उत्तर सिक्कीमच्या या परिसरात वातावरण देखील अत्यंत खराब होते. याठिकाणी गेलेल्या बचाव दलामध्ये सेना आणि वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्सचा समावेश होता. ते उत्तर सिक्कीमच्या उंच भागात आपात्कालीन लँडिगपर्यंत पोहोचले आणि वादळाचा सामना करत त्यांनी 4 भारतीय वायुसेनेचे जवान आणि एक डिसपॅच कर्मचारी यांची सूटका केली.

(हे वाचा-92 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात, व्हायरससोबत लढण्याचं सांगितलं सिक्रेट)

गुरूवारी  देखील भारतीय वायुसेनेचे सिक्कीममध्ये चॅटेन ते मुकुंतागला नियमित जाणारे लढाऊ विमान एमआय-17 या हेलिकॉप्टरला सुद्धा खराब वातावरणामुळे निर्धारित हेलिपॅड व्यतिरिक्त 10 नाविक मैल दूर अंतरावर इमरजन्सी लँडिंग करावे लागले होते. यामध्ये कोणतेही नुकसान झाले नव्हते. त्याठिकाणी फसलेल्या दलाला देखील वायुसेनेने सुखरूप वाचवले होते.

(हे वाचा-नोकरी गेली तरी नो टेन्शन! मोदी सरकारच्या या योजनेतून मिळणार 2 वर्षांपर्यंत पगार)

त्याचप्रमाणे शुक्रवारी पंजाबमध्ये देखील एका IAF लढाऊ विमानाला अपघात झाला होता. या अपघातात विमानाच्या पायलटचा जीव वाचला आहे. नवाशहर जिल्ह्यातील रुडकी कलां या गावाजवळ भारतीय हवाई दलाच्या मिग-29 या लढाऊ विमानाचा अपघात झाला. होशियारपूरच्या एसएसपी यांनी यासंदर्भात माहिती दिली. एसएसपी गौरव गर्ग यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटना घडलेल्या विमानातून पायलटला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या पायलटला तपासणीसाठी होशियारपूरमधील जवळच्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

संपादन- जान्हवी भाटकर

First published: May 9, 2020, 9:37 AM IST

ताज्या बातम्या