पाकिस्तानच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकले 50 लष्करी जवान

फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकल्याच्या प्रकरणांवर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती.

News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2019 07:47 PM IST

पाकिस्तानच्या 'हनी ट्रॅप'मध्ये अडकले 50 लष्करी जवान

श्रेया धौंडियाल, नवी दिल्ली 12 जानेवारी : सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय लष्करी जावानांना जाळ्यात ओढण्याचा  प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. लष्कराच्या हालचालींची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला पुरविल्याच्या प्रकरणावरून 50 जवान लष्करी गुप्तहेर विभागाच्या रडारवर आले आहेत.


फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकल्याच्या प्रकरणांवर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती. त्याची तीव्रता कमी होत नाही तोच नवं प्रकरण पुढे आलंय. अनिका चोपडा नावाच्या बनावट फेसबुक अकाउंटवरून ही माहिती पाकिस्तानात जात होती असंही उघडकीस आलं आहे.


अनिका चोपडांनी आपण लष्करात नर्सिंग विभागात असल्याची माहिती आपल्या अकाउंटवर दिली होती. मात्र लष्कराने केलेल्या चौकशीत हे अकाउंट पाकिस्तानातून ऑपरेट होत असल्याची माहिती उघड झाली. या ट्रॅपमध्ये 50 जवान अडकले आहेत.

Loading...


या प्रकरणी जैसलमेर सीमेवर तैनात असणाऱ्या सोमवीर सिंह या जवानाला अटक करण्यात आली आहे. सोमवीरने लष्कराच्या हालचाली, कवायती, नियुक्ती इत्यादी बाबतीत महत्त्वाची माहिती अनिकाला पुरवली होती.


सोमवीरने फक्त माहितीच दिली नाही तर काही फोटो आणि रणगाड्यांची माहितीही पुरवल्याचं लष्कराच्या चौकशीत आढळून आलं आहे. सोमवीरची अनिकाशी 2016मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. अनिकाने सोमवीरला आपल्या जाळ्यात अडकवलं. सोमवीर त्यात एवढा अडकला की तो आपल्या बायकोला घटस्फोट द्यायलाही तयार झाला होती.


लष्कराच्या गुप्तचर विभागाला याचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी गेली काही महिने या जावनांचे फोन निगराणीखाली ठेवले होते. त्यात आक्षेपार्ह चॅटिंग होत असल्याचं आढळून आलं. दिवसातल्या विशिष्ट वेळेतच त्यांचं बोलणं होत असे. त्यात तो सर्व माहिती देत होता. अनिकाच्या खात्यातून सोमवीरला पैसे मिळाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.


VIDEO मोदींची भाषणे ऐकली की 'गजनी'तला अमिर खान आठवतो - धनंजय मुंडे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2019 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...