#BREAKING : सीमेवर तणाव, भारताचे 4 तर चीनचे 7 सैनिक जखमी

#BREAKING : सीमेवर तणाव, भारताचे 4 तर चीनचे 7 सैनिक जखमी

भारताचे 4 तर चीनचे 7 सैनिक जखमी झाले असल्याची माहिती आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : सिक्किममधील भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्य आमने-सामने आले आहे. भारतीय सैन्य आणि चिनी पीएलए यांच्यात संघर्ष झाला. यामध्ये भारताचे 4 तर चीनचे 7 सैनिक जखमी झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे सीमेवर काही काळ तणाव निर्माण झाला.

उत्तर सिक्कीमचा नकुला सेक्टर इथं भारत-चीन सैन्यामध्ये संघर्ष झाला. त्यानंतर निश्चित यंत्रणेसह स्थानिक पातळीवर प्रकरण निकाली काढले गेले. थोड्या काळासाठी ही तात्पुरती झडप झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही सैन्यामधील संघर्षाचा हा प्रकार बर्‍याच दिवसांनी घडला. या संपूर्ण घटनेबाबत अधिकृत माहिती ईस्टर्न कमांड देणार आहे.

Tags:
First Published: May 10, 2020 11:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading