BREAKING NEWS : भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ भारतीय असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतल्या प्रतिष्ठित मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 08:44 PM IST

BREAKING NEWS : भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

मुंबई, 14 ऑक्टोबर : भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ भारतीय असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतल्या प्रतिष्ठित मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांच्यासोबत आणखीही दोन जणांना अर्थशास्त्रासाठी हा मानाचा नोबेल पुरस्कार मिळाला. याआधी भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनाही 1998 मध्ये अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनी भारतीय अर्थतज्ज्ञाला हा पुरस्कार जाहीर झाला.

जागतिक स्तरावरची गरिबी हटवण्यासाठी केलेल्या संशोधनाबद्दल अभिजीत बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या पत्नी इस्थर डफलो आणि मायकेल क्रेमर या अर्थतज्ज्ञांचीही गौरव झाला आहे.

The 2019 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel has been awarded to Abhijit Banerjee, Esther Duflo and Michael Kremer “for their experimental approach to alleviating global poverty.”#NobelPrize pic.twitter.com/SuJfPoRe2N

Loading...

अभिजीत बॅनर्जी 58 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म कोलकात्याचा. अभिजीत बॅनर्जी यांचं शिक्षणही याच शहरात झालं. त्यांनी कोलकात्यात साउथ पॉइंट स्कूल आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. 1981 मध्ये त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये एम.ए. केलं. त्यानंतर 1988 मध्ये ते हॉर्वर्डमध्ये पीएच. डी. करण्यासाठी गेले. Essays in Information Economics या विषयावर त्यांनी पीएच. डी. केली आहे.नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीवरही त्यांनी मत व्यक्त केलं होतं. मला या निर्णयामागचा तर्क कळत नाही, असं ते म्हणाले होते.

==========================================================================================

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-413474" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDEzNDc0/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...